Thakur Village Kandivali East : कांदिवली पूर्व येथे वसलेले राहण्यासाठी परिपूर्ण ठिकाण म्हणजे ठाकूर व्हिलेज

139
Thakur Village Kandivali East : कांदिवली पूर्व येथे वसलेले राहण्यासाठी परिपूर्ण ठिकाण म्हणजे ठाकूर व्हिलेज

काही वर्षांपूर्वी राहण्यासाठी मुंबईत अनेक नवी ठिकाणे निर्माण झाली. जंगल तोडून आणि खाडीवर भर टाकून कॉंक्रिटिकरण करुन लोकांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली. नवी मुंबईसारखं एक अख्खं नवं शहर निर्माण करण्यात आलं. मुंबई हे आत अबेट राहिलं नसून ते आधुनिक शहर झालं आहे. (Thakur Village Kandivali East)

अनेक लोक मुंबईत घर घेण्याचा प्रयत्न करतात. मात्र कुठे घर घ्यावं, हा प्रश्न असतोच. आज आम्ही तुम्हाला मुंबईतील असा एका राहण्यायोग्य ठिकाणाबद्दल सांगणार आहोत. ठाकूर व्हिलेज म्हणजेच ठाकूर गाव हे राहण्यासाठी एक आदर्श ठिकाण आहे. (Thakur Village Kandivali East)

(हेही वाचा – 279 IPC : काय आहे आयपीसी कलम २७९? या कलमाचा कोणत्या गुन्ह्यासाठी वापर केला जातो?)

ठाकूर व्हिलेजमध्ये आता अनेक सुविधा देखील उपलब्ध आहेत. ठाकूर व्हिलेज हे कांदिवली पूर्वेतील एक प्रमुख निवासी टाउनशिप आहे. इथे उच्चभ्रू अपार्टमेंट्स असून राहण्यासाठी ही आलिशान जागा आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळ वसलेले हे ठिकाण आता व्यवसायाचे केंद्र देखील झाले आहे. (Thakur Village Kandivali East)

या परिसरात १ बीएचके ते ३ बीएचके अपार्टमेंट्स तुम्हाला उपलब्ध होतील. मात्र हे उच्चभ्रू ठिकाण असल्यामुळे इथे घर देखील महागच आहे. ठाकूर गाव हे पश्चिम द्रुतगती महामार्गावर वसलेले आहे, जे मुंबईच्या इतर भागांना जोडते. म्हणून इथून दुसर्‍या ठिकाणी प्रवास करताना त्रास होत नाही. सिनर्जी बिझनेस पार्क आणि मारुती बिझनेस पार्क सारखी रोजगार केंद्रे ६-१२ किमी अंतरावर आहेत. (Thakur Village Kandivali East)

(हेही वाचा – City Civil Court Mumbai : जाणून घ्या मुंबईतील सिटी सिव्हिल कोर्टाचा इतिहास!)

हे पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय विभागात येणाऱ्या कांदिवली आणि बोरिवली रेल्वे स्थानकांवर उतरुन तुम्ही रिक्षा किंवा बसद्वारे ठाकूर गावात जाऊ शकता. बस क्रमांक २८७ द्वारे तुम्ही कांदिवली स्टेशनवरुन जाऊ शकता, तसेच २०९, ६२९ आणि ७०३ या बस बोरिवलीवरुन जातात. (Thakur Village Kandivali East)

ठाकूर गावात अनेक सुविधा आहेत. तसे की रुग्णालये, शाळा, महाविद्यालये, क्रिडा जगत, सिनेमागृह व दैनंदिन गोष्टी देखील येथे सहज उपलब्ध होतात. त्यामुळे मुंबईत घर घेणारे ठाकूर गावात येऊन राहणे पसंत करतात. तंतामुक्त आणि सुरक्षित असे हे टाऊनशिप खरोखरच कुटुंबासोबत राहण्यासाठी आदर्श आणि परिपूर्ण ठिकाण आहे. (Thakur Village Kandivali East)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.