Thalaiyar Falls : थलैयार धबधबा पाहायचाय? मग हा लेख वाचा आणि मनसोक्त आनंद लुटा!

97
Thalaiyar Falls : थलैयार धबधबा पाहायचाय? मग हा लेख वाचा आणि मनसोक्त आनंद लुटा!
थलैयार धबधबा, तामिळनाडू

थलैयार धबधबा (Thalaiyar Falls) हा तामिळनाडू राज्यातला एक धबधबा आहे. ह्या धबधब्याचं क्षेत्र थेनी वनविभागाने प्रतिबंधित केलेलं आहे. या धबधब्याला ‘रॅट टेल फॉल्स’ म्हणूनही ओळखलं जातं. हा धबधबा तामिळनाडू राज्यातल्या थेनी नावाच्या जिल्ह्यातून वाहतो. तामिळनाडू राज्याच्या दक्षिणेला वाहणाऱ्या वैगई नदीच्या उपनद्यांपैकी एक मंजलार नदी आहे. या नदीच्या प्रवाहातून थलैयार धबधबा वाहतो.

थलैयार धबधब्याची उंची

ह्या धबधब्याची उंची २९७ मीटर म्हणजेच ९७४ फूट इतकी आहे. हा तामिळनाडूमधला सर्वात उंच धबधबा आहे. तर भारतातला सहाव्या क्रमांकाचा सर्वात उंच धबधबा आणि जगातला २६७ व्या क्रमांकाचा सर्वांत उंच धबधबा आहे.

(हेही वाचा – Assembly Election : आमदार रांजळे यांचे अवघडच ? भाजपामधून बंड, मुंडे ही विरोधात गेले…)

थलैयार धबधब्याचं वर्णन

ज्या दिवशी वातावरण स्वच्छ असेल त्या दिवशी या धबधब्याच्या पश्चिमेला ३.६ किलोमीटर म्हणजेच २.२ मैल एवढ्या दूर असलेल्या बटालुगुंडू-कोडाईकनाल घाट रोडवरच्या दम दम रॉक व्ह्यूपॉईंटवरून थलैयार धबधब्याचं (Thalaiyar Falls) मनमोहक नैसर्गिक सौंदर्य पाहता येतं. तिथुन दरीच्या पलीकडे पाहिलं तर बाहेर पडलेल्या काळ्या खडकाच्या कड्यावरून खाली येणारी पाण्याची लांब पातळ पांढरी पट्टी दिसते. या धबधब्याच्या वरच्या बाजूला असलेल्या काठावर दोन्ही बाजूला कमी काँक्रीटची भिंत आहे. या भिंतीमुळे पाण्याचा प्रवाह उंदराच्या शेपटीसारखा दिसतो. म्हणूनच या धबधब्याला ‘रॅट टेल फॉल्स’ असंही म्हणतात.

कड्याच्या भिंतीवरून चालत धबधब्याच्या (Thalaiyar Falls) मध्यभागी जाता येतं. कड्याच्या एका भिंतीच्या खाली दीड मीटरच्या अंतरावर एक सपाट खडक आहे. या खडकावर सहज उतरता येतं. इथे उतरल्यानंतर तळाशी असलेली जंगलातून शांतपणे पुढे जाणारी एक छोटी नदी दिसते. मागे वळून पाहिल्यावर फ्रीफॉलमधलं शांतपणे पडणारं पाणी पाहता येतं. खाली कोसळणाऱ्या पाण्याचा आवाज वर येत नाही. फक्त त्या दगडी भिंतींभोवती पाण्याचा आवाज येतो. पेरुमल मलाई गावापासून ९ किलोमीटर म्हणजेच ५.६ मैल एवढ्या अंतरावर खाली वाहत येणारं नदीचं पाणी प्रदूषित असू शकतं. म्हणून त्या परिसरातल्या लोकांना ते पाणी पिऊ नका असा सल्ला दिला जातो.

(हेही वाचा – Amit Shah: छत्तीसगडमध्ये दहशतवाद्यांचा होणार खात्मा! जाणून घ्या काय आहे मोदी सरकारची संपूर्ण योजना)

थलैयार धबधब्याकडे कसं जाता येतं?

थलैयार धबधबा (Thalaiyar Falls) हा सामान्य लोकांसाठी दुर्गम समजला जातो. कारण तिथे जाण्यासाठी रस्ता नाही. धबधब्याचा वरचा भाग हा एक आव्हानात्मक हाईक डेस्टिनेशन आहे. इथपर्यंत फक्त गिर्यारोहकच पोहोचू शकतात. पण गिर्यारोहकांनी सावधगिरी बाळगायला हवी. कारण २००६ साली दोन परदेशी पर्यटक धबधब्याच्या शिखरावरून पडून मरण पावले होते.

उन्हाळ्यामध्ये मांजलार धरणापासून सुरुवात करून धबधब्याच्या तळापर्यंत जाणं शक्य आहे. तरीही ही पायवाट थोडी अवघडच आहे. इथून पायी चालत जाताना मांजलार जलाशयाच्या आजूबाजूला तुम्हाला आंब्याच्या बागा, बटाट्याची शेतं आणि कामाक्षी देवीचं एक लहानसं देऊळ दिसतं. अशी आख्यायिका आहे की, कामाक्षीचा जन्म इथे धबधब्याच्या पायथ्याशी बांबूच्या झुडुपामध्ये झाला होता म्हणून तिला चंद्रकिलानाई कामाक्षी असं म्हणतात.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.