सास-याच्या प्रॉपर्टीवर जावयाचा हक्क आहे का? वाचा न्यायालय काय म्हणतं?

मुलीशी लग्न केल्यानंतर त्याला कुटुंबातील सदस्य म्हणून दत्तक घेतल्याचा दावा लाजीरवाणा आहे.

126

एकुलत्या एक श्रीमंत मुलीशी लग्न करायचं म्हणजे तिच्या तीर्थरुपांची सगळी प्रॅापर्टी आपली होणार. मग आपलं आयुष्य मस्त सास-याच्या पैशावर काढायचं असं ब-याच मुलांचं स्वप्न असतं. सास-याची एकुलती एक बेटी ही आपलीच धनाची पेटी आहे असं काही जावयांना वाटतं. घरजमाई बन जाऊँ, बैठके मैं मेवा खाऊँ, उसके बाप की फरारी हो, जीसमें अपनी सवारी हो… या स्टाईल चित्रपटातल्या गाण्यानुसार बरेचं तरुण असंच स्वप्न बघायला लागतात. पण केरळच्या उच्च न्यायालयाने आता सास-याच्या मालमत्तेवर जावयाला कोणताही हक्क मिळणार नसल्याचा निर्णय सुनावला आहे.

केरळ उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार, जावयाला त्याच्या सासऱ्याच्या मालमत्तेत आता प्रवेश मिळणार नाही. त्या जावयाने जर त्या विशिष्ट घराच्या बांधकामावर पैसे गुंतवले असतील तरी त्या मालमत्तेवर त्याला आपला अधिकार सांगता येणार नाही.

(हेही वाचाः मित्राची हत्या करून रचला बनाव! आरोपीला आठ तासांतच अटक)

काय आहे प्रकरण

कन्नूरच्या डेव्हिस राफेलने मुन्सिफ न्यायालयाच्या निर्णयाला विनंती करणारी याचिका(आरएसए क्रमांक 418/2019) दाखल केली होती. त्यात त्याने म्हटलं आहे की, त्याचे सासरे हेंड्री थॉमस यांच्या मालमत्तेत त्याचाही हक्क आहे. कारण हेंड्री थॅामस यांच्या एकुलत्या एका मुलीशी लग्न केल्यामुळे मी त्या घराचा घरजावई असल्याने, थोडक्यात त्या कुटुंबाने मला दत्तक घेतल्यासारखेच आहे. त्यामुळे माझा सास-याच्या मालमत्तेत अधिकार आहे. डेव्हिस राफेलने दावा केला की, त्याने संबंधित मालमत्तेच्या निवासस्थानाच्या बांधकामात देखील निधी गुंतवला आहे.

(हेही वाचाः भारत सरकारने बनवलेली सोन्याची नाणी कुठे मिळतात माहीत आहे का? वाचा)

असा आहे न्यायालयाचा निर्णय

केरळ उच्च न्यायालयाने नमूद केले की, राफेलने इमारतीच्या विकासावर पैसे गुंतवले असले, तरीही त्याचा हेंड्री थॅामस या आपल्या सास-याच्या मालमत्तेवर आणि इमारतीवर कायदेशीर अधिकार नाही. मुलीशी लग्न केल्यानंतर त्याला कुटुंबातील सदस्य म्हणून दत्तक घेतल्याचा राफेलचा दावा लाजीरवाणा आहे, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. संबंधित कुटुंबाने त्याला दत्तक घेतलं असलं तरी त्याचा आपल्या सास-याच्या मालमत्तेवर कोणताही अधिकार नाही.

(हेही वाचाः राज्यसभेतील खासदार ‘दांडीबहाद्दर’? केवळ इतकेच सदस्य असतात कायम ‘हजर’)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.