देशातील प्रसिद्ध शाही रेल्वेपैकी एक असणाऱ्या डेक्कन ओडिसी ही आता नव्या रूपात व नव्या ढंगात धावण्यास सज्ज होत आहे. डब्यांच्या रंगसंगतीपासून ते इंटीरियर डिझाईनपर्यंत सर्व प्रकारचे बदल करण्यास सुरुवात झाली आहे. एमटीडीसी (महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ) ने टूर ऑपरेटरची जबाबदारी इबिक्स कॅश ह्या आंतरराष्ट्रीय संस्थेला दिली आहे.
जूनमध्ये पर्यटकांना घेता येणार आनंद
जूनपासून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व वैभवशाली तसेच निसर्ग सौंदर्याने नटलेल्या स्थळाचे दर्शन पर्यटकांना घडणार आहे. यंदाच्या वर्षी पहिल्यांदाच वाईल्ड लाईफ प्रेमींसाठी ताडोबाच्या सफरीचेदेखील आयोजन केले आहे. डेक्कन ओडिसी ही भारतातील चार शाही रेल्वेंपैकी एक रेल्वे आहे. कोरोनाच्या संकटकाळात बंद झालेली डेक्कन ओडिसी आता धावण्यास सज्ज होत आहे. जूनपासून पर्यटकांना डेक्कन ओडिसीतून महाराष्ट्राचे सौंदर्य पाहता येईल. त्या दृष्टीने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी)ने तयारीदेखील सुरू केली आहे.
( हेही वाचा: आता मदरशांमध्येही ड्रेस कोड लागू, सरकारचा मोठा निर्णय! )
प्रवासदेखील आलिशान आणि संस्मरणीय होणार
डेक्कन ओडिसीच्या २२ डब्यांचे पीओएच (पिरॉडिकल ओव्हर हॉलिंग) चे काम सुरू आहे. येत्या १० ते १५ दिवसांत हे काम पूर्ण होईल. त्यानंतर डबे अधिक आकर्षक दिसण्यावर भर दिला जाणार आहे. शिवाय पर्यटकांना आलिशान प्रवासाचा अनुभव यावा याकरता डब्याच्या आतील बाजूने डेकोरेटरदेखील बदलण्यात येणार आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या वैभवशाली स्थळाचे दर्शन घेताना प्रवासदेखील आलिशान व संस्मरणीय होईल, यासाठी एमटीडीसी प्रयत्नशील आहे.
Join Our WhatsApp Community