बॉलीवूडमधील ड्रगचे भांडाफोड आमच्यामुळे नाही – व्हाट्सअप 

103

मुंबई – सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूचा तपास करता करता तपास यंत्रणांच्या हाती  बॉलीवूडमधील ड्रग कनेक्शन  झाले, त्यासाठी व्हाट्स अप वरील झालेले संभाषण  यंत्रणांसाठी फायद्याचे ठरले, त्यामुळे व्हाट्स अप वरील चॅट सुरक्षित नाहीत अशी चर्चा सुरु झाली असतानाच व्हाट्स अपने बॉलीवूडमधील ड्रग कनेक्शन उघड करणारे चॅट आम्ही दिले नाहीत, असा खुलासा केला.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूप्रकरणी सुरू असलेल्या तपासादरम्यान बेकायदा ड्रग्ज सेवन, साठवणूक प्रकार समोर आले. या प्रकरणी एनसीबीने सुरू केलेल्या चौकशीत अनेक बड्या लोकांची नावे समोर आली होती. तसेच त्यांचे चॅटही व्हायरल झाले होते. त्यामुळे बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरणात एनसीबीला जुने संदेश व्हाट्स अपने दिले का, असा प्रश्न निर्माण झाला. त्यावर व्हॉट्सअ‍ॅपवरील संदेश सुरक्षित असून ते कोणत्याही तिसर्या व्यक्तीला पाहता येऊ शकत नाहीत म्हणजेच कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीपर्यंत हे संदेश पोहोचू शकत नाहीत, असे व्हॉट्सअ‍ॅपने म्हटले आहे.

एन्ड टू एन्ड इनक्रिप्शनद्वारे व्हॉट्सअ‍ॅप आपले संदेश सुरक्षित ठेवत आहे. तसेच हे संदेश दोन व्यक्तींमध्येच सुरक्षित असतात. ज्याने संदेश पाठवला आहे त्याला आणि ज्याला संदेश पाठवला आहे त्यालाच हे संदेश वाचता येतात. युझर्स केवळ फोन नंबरच्या माध्यमातून व्हॉट्सअ‍ॅपवर साईनअप करतात आणि व्हॉट्सअ‍ॅपची तुमच्या संदेशापर्यंत पोहोच नाही, अशी माहिती व्हॉट्सअ‍ॅपच्या प्रवक्त्यांकडून देण्यात आली.

ऑन स्टोरेज डिव्हाईससाठी व्हॉट्सअ‍ॅप ऑपरेटिंग सिस्टम तयार करणाऱ्यांद्वारे आखण्यात आलेल्या निर्देशांचे पालन करत. आम्ही कायमच बायोमॅट्रिक आयडी. पासवर्ड अशा सर्व सुरक्षा उपायांचा वापर करण्याचा सल्ला देतो. जेणेकरून युझर्सच्या संदेशांपर्यंत कोणत्याही तिसऱ्या पक्षाचे डिव्हाईस पोहोचले जाणार नाही, असेही त्यांनी नमूद केले. २००५ पासून मोबाईल फोन क्लोनिंगचा तंत्रज्ञानाचा वापर करून अनेकांचे संदेश मिळवले गेल्याचे अनेकांचे मत आहे. क्लोन फोनला व्हॉट्सअ‍ॅप बॅकअप अॅक्सेस करणे शक्य असून इनक्रिप्टेड नसलेल्या ड्राईव्हनाही अॅक्सेस करता येणे शक्य आहे. ड्रग्ज प्रकरणी सुरू असलेल्या तपासादरम्यान व्हॉट्सअ‍ॅप चॅटच्या आधारावर अनेकांना समन्स बजावण्यात आलं होतं. त्यानंतर व्हॉट्सअ‍ॅप चॅट सुरक्षित आहे की नाही असे प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.