बुधवारच्या दिवसभराच्या पावसाने मुंबईतील विविध ठिकाणी चांगलाच मारा केला. चोवीस तासांतील नोंदीनुसार, मुंबईत सर्वात जास्त पाऊस भायखळ्यात झाला आहे. भायखळ्यात १००.५ मिमी पावसाची नोंद झाल्याची माहिती हवामान खात्याकडून दिली गेली.
हवामान खात्याकडून पावसाची नोंद
बुधवारी सकाळी साडेआठ ते गुरुवारी सकाळी साडेआठ या चोवीस तासांच्या पावसाची नोंद हवामान खात्यानं जाहीर केली. मुंबईतील तापमान आणि पावसासाठी सांताक्रूझ केंद्रातील नोंद ग्राह्य धरली जाते. सांताक्रूझच्या नोंदीत ९१.२ मिमी पावसाची नोंद झाली. मात्र सांताक्रूझपेक्षाही इतर भागांत पावसाचा मारा जास्त दिसून आला. भायखळ्याखालोखाल माटुंगा, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, माटुंग्यात जास्त पाऊस झाला. दोन्ही ठिकाणी ९४.५ मिमी पाऊस झाल्याची नोंद आहे. जुहू एअरपोर्ट तसेच कुलाब्यातही ९३ मिमी पाऊस झाला. विक्रोळीत ८८.५ मिमी पावसाची नोंद झाली.
(हेही वाचा -डिसेंबरमधील थंडीच्या मोसमातील नवा रेकॉर्ड!)
मुंबईतली हवेची गुणवत्ता १०४ वर
पावसामुळे मुंबईतली हवेची गुणवत्ता १०४ वर नोंदवली गेली आहे. ही नोंद समाधानकारक वर्गवारीत मोडत असल्याचं सफर या प्रणालीतून दिसून आलं. मात्र पाऊस पूर्णपणे थांबलेल्या कुलाबा, वांद्रे-कुर्ला संकुल आणि मालाडमध्ये हवेची गुणवत्ता थोडी खराब आढळली. कुलाब्यात अतिसूक्ष्म धूलिकण १५९, वांद्रे-कुर्ला संकुलात १११ आणि मालाडमध्ये ११५ वर दिसून आलेत.
Join Our WhatsApp Community