Honor Magic 6 Pro : ‘या’ फोनमध्ये आहे १८० मेगापिक्सेलची टेलिफोटो लेन्स असलेला दमदार कॅमेरा

Honor Magic 6 Pro : ऑनर मॅजिक ६ प्रो ५जी भारतात लाँच झाला आहे.

98
Honor Magic 6 Pro : ‘या’ फोनमध्ये आहे १८० मेगापिक्सेलची टेलिफोटो लेन्स असलेला दमदार कॅमेरा
  • ऋजुता लुकतुके

ऑनर कंपनीने आपल्या नवीन फोनला मॅजिक असं नाव दिलं आहे. तो वापरणाऱ्यांनी फोनची जादू अनुभवल्याचाच निर्वाळा दिला आहे. ही जादू आहे कॅमेरा आणि स्पीकरच्या आवाजात आहे. फोनमधील स्पीकर, कॅमेरा, डिस्प्ले, बॅटरी आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित प्रोग्रामना ५ डीएक्सोमार्क गोल्ड लेबल मिळाल्याचा दावा कंपनीने केला आहे. मॅजिक प्रोमधील ६.८ इंचांचा डिस्प्ले एलटीपीओ डिस्प्ले श्रेणीतील आहे. आणि त्याची प्रखरता ५,००० नीट्स इतकी आहे. तर रिफ्रेश रेट आहे १२० हर्ट्झ इतका.

फोनची बॅटरी सिलिकॉन कार्बनची असून तिची क्षमता ५.६०० एमएएच इतकी आहे. केबलला जोडलेली असेल तर चार्जिंग क्षमता ८० वॅट आणि वायरलेस चार्जिंगसाठी क्षमता ६६ वॅट इतकी आहे. पण, फोनचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे ती कॅमेरात असलेली १८० मेगापिक्सेलची टेलिफोटो लेन्स. अँड्रॉईड १४ प्रणालीवर हा फोन आधारित आहे आणि स्नॅपड्रॅगमन ८ चा तिसऱ्या पिढीतील प्रोसेसर या फोनमध्ये आहे.

(हेही वाचा – Anis : अंनिसचे मूळ नाव ‘मानवीय नास्तिक मंच’; देव, धर्माला न मानणारी संघटना; चेतन राजहंस यांनी केली पोलखोल)

ऑनर मॅजिक ६ प्रो कॅमेरात सेल्फी कॅमेराच्या व्यतिरिक्त ३ कॅमेरे आहेत. यातील प्राथमिक कॅमेरा आणि अल्ट्रावाईड कॅमेरे हे ५० मेगा पिक्सेलचे आहेत. तर १८० मेगापिक्सेलची पेरिस्कोप टेलिफोटो लेन्सही या फोनमध्ये आहे. एआय फाल्कन ही कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित कॅमेरा प्रणाली या फोनमध्ये आहे.

स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर भारतात या फोनची विक्री सुरू होणार आहे. सुरुवातीला ॲमेझॉन वेबसाईटवर फोनची नोंदणी करता येईल. या फोनची किंमत ८९,९९९ रुपयांपासून सुरू होतेय.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.