नाशिकमध्ये तापमानाचा सर्वाधिक नीच्चांक, मंगळवारीही राज्यात थंडीचा कडाका

सोमवारी राज्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद नाशकात झाली. नाशिकमध्ये किमान तापमानाची नोंद चक्क ७.३ अंश सेल्सिअसपर्यंत झाली. विदर्भ वगळता आता राज्यातील इतर भागांत कमाल आणि किमान दोन्ही तापमानांतही घट सुरु आहे. मुंबईत उद्या किमान तापमान १२ अंश सेल्सिअसवर नोंदवले जाईल, असा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे उद्या घराबाहेर पडताना स्वेटर, मफलर आणि कानटोप्या घेऊनच बाहेर पडावे लागणार आहे.

राज्यात कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात चांगलीच तापमानाच घट सुरु असल्याने थंडी आता अनुभवता येत आहे. ऐन जानेवारी महिन्याच्या दुस-या आठवड्यात थंडीच्या मोसमाने राज्याने बहर आणला आहे. किमान तापमान बहुतांश भागांत दहा ते पंधरा अंशाच्या आसपास नोंदवले जात आहे. मात्र कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत तीन ते पाच अंशाने घसरण झाल्याने थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. मात्र कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील तापमानाची हुडहुडी मंगळवारनंतर ब्रेक घेईल. किमान आणि कमाल तापमानात तीन अंशाने वाढ येत्या गुरुवारपर्यंत दिसून येईल, असा अंदाज वेधशाळेच्या अधिका-यांनी दिली.

( हेही वाचा : सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री, सीएनजीसह घरगुती गॅस महागला! )

राज्यातील कमाल आणि किमान तापमान

जिल्हा – किमान (अंश सेल्सिअसमध्ये) – कमाल (अंश सेल्सिअसमध्ये)

 • मुंबई (सांताक्रूझ) – १३.२ – २५.१
 • मुंबई (कुलाबा) – १५.२ – २५.७
 • ठाणे – १८ – तापमानाची नोंद नाही
 • डहाणू – १५.५ – २३
 • नाशिक – ७.३ – २६.६
 • जळगाव- ९ – २५.६
 • मालेगाव- १०.२ – तापमानाची नोंद नाही
 • पुणे- १२ – २९.३
 • महाबळेश्वर – १०.४ – २१.६
 • सातारा – १५.२ – २८.२
 • औरंगाबाद – ११ – २७.८
 • सांगली – १५.९ – २९.२
 • सोलापूर – १६.७ – ३०.६
 • कोल्हापूर – १६.९ – २८.८
 • अमरावती – १५.५ – २६
 • गोंदिया – १६.८ – २३
 • नागपूर – १७.६ – तापमानाची नोंद नाही
 • चंद्रपूर – १७.२ –२४

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here