छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) हे मुंबई शहरामधील एक ऐतिहासिक व सर्वात मोठे रेल्वे स्थानक आहे. सीएसएमटी हे युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान आणि त्यासोबत मध्य रेल्वेचे मुख्यालय आहे. मुंबईचे हे रेल्वे स्टेशन अतिशय सुंदर असल्याने ते अनेक चित्रपटांतही दाखवण्यात येते. मुंबईला भेट देणार असाल तर या स्टेशनला नक्की भेट द्या.
कटक रेल्वे स्टेशन हे अतिशय सुंदर रेल्वे स्टेशन आहे. लोक हे रेल्वे स्टेशन पाहण्यासाठी खास येतात. किल्ल्याच्या स्वरुपात हे रेल्वे स्टेशन आहे.
लखनऊ रेल्वे स्टेशन हे लखनऊचे मुख्य रेल्वे स्थानक आहे. चारबाग येथे असल्यामुळे त्याला चारबाग स्टेशन असेही म्हणतात. हे 1914 मध्ये पूर्ण झाले आणि राजस्थानी इमारतीच्या शैलीची झलक त्या वास्तूमध्ये पाहिली जाऊ शकते.
जैसलमेर रेल्वे स्टेशन हे राजस्थानमधील जैसलमेर येथे स्थित एक प्रमुख रेल्वे स्टेशन आहे. हे एक शांत ठिकाण आहे. इथे तुम्ही मनमोकळे फिरु शकता.
घूम रेल्वे स्टेशन हे पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग येथे स्थित दार्जिलिंग हिमालयन रेल्वेचे स्थानक आहे. 2 हजार 258 मीटर (7,407 फूट) उंचीवर हे भारतातील सर्वात उंच रेल्वे स्टेशन आहे. घूम मठ आणि दार्जिलिंग हिमालयीन रेल्वेचे प्रसिद्ध टर्निंग पॉइंट, बतासिया लूप घूममध्ये आहे. इथल्या सुंदर दृश्यांचा तुम्हाला आनंद घेता येईल.