हॉटेलच्या जेवणाची थाळी महागणार, कारण काय

168

आधीच कोरोनाचं संकट आणि त्यात इंधन दरवाढ यामुळे सामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री लागली असताना आता सिंलेंडरच्या महागाईमुळे हॉटेलच्या खाद्यपदार्थांचे भाव वधारणार आहेत. परिणामी हॉटेलच्या जेवणाची थाळी महागणार आहे, त्यामुळे खवय्यांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. आजपासून म्हणजेच 1 डिसेंबरपासून कमर्शिअल सिलिंडरच्या दरात तब्बल 100 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच कमर्शिअल सिलेंडरच्या दरात 266 रुपयांनी वाढ करण्यात आली असताना ही वाढ ग्राहकांना चांगलीच चिंतेत भर टाकणारी आहे. इतकेच नाही तर गेल्या दोन महिन्यांत कमर्शिअल गॅसच्या किंमतीमध्ये 366 रुपयांची वाढ झाली आहे.

(हेही वाचा – धाकधूक वाढली! अफ्रिकेतून राज्यात आलेले 6 बाधित प्रवासी ‘या’ शहरात?)

दरम्यान, दिलासादायक बाब म्हणजे घरगुती सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. 14.2 किलो विनाअनुदानित एलपीजी सिलेंडरची किंमत 899.50 रुपयांवर कायम आहे.

जाणून घ्या कोणत्या शहरात किती दर?

  • दिल्ली- 2101 रुपये
  • कोलकाता – 2177 रुपये
  • मुंबई – 2051 रुपये
  • चेन्नई – 2234 रुपये

हे नियम देखील बदलले

दरम्यान, 1 डिसेंबरपासून अनेक नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. या बदलांमध्ये LPG सिलेंडरची किंमत, गृहकर्ज, SBI क्रेडिट कार्ड, आधार-UAN लिंकिंग इत्यादींचा समावेश आहे. यातील नवीन नियम किंवा जुन्या नियमांमध्ये बदल हे प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी लागू केले जातात.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.