‘या’ रशियन पक्ष्याला हवीहवीशी वाटणारी मुंबई झाली नकोशी!

99

थेट रशियाहून आलेल्या स्थलांतरित पक्ष्याला एरव्ही हवीहवीशी वाटणारी  मुंबई नकोशी झाली आहे. अमूर फाल्कॉन असे या पक्ष्याचं नाव असून, नागालँड राज्याचा हा राज्यपक्षी आहे. गेला आठवडा नर आणि मादी अमूर फाल्कॉनसाठी तापदायक ठरला.  कारण ७ डिसेंबर रोजी दक्षिण मुंबईतील चारचाकी जवळ धडपडत चालताना हा पक्षी एका महिलेला दिसला. या पक्ष्याला एका महिलेनं पाहिलं आणि हा पक्षी अशक्त असल्यानं महिलेनं या मादी पक्ष्याला उचलून आपल्या घरी आणलं. पक्ष्याबाबत फारशी माहिती नसताना त्यांनी ‘स्प्रेडिंग अवेअरनेस ऑन रेप्टाइल्स एण्ड रिहेबिलिटेशन प्रोग्राम’ (सर्प) या प्राणीप्रेमी संस्थेकडे घटनेची माहिती दिली. ८ डिसेंबर रोजी बुधवारी सर्प संस्थेच्या रोशन अंगाणे या स्वयंसेवकांने अशक्त अमर फाल्कॉनला संस्थेच्या कार्यालयात आणले.

(हेही वाचा –सर्वोच्च न्यायालयाचा निकाल! ‘त्या’ आमदारांचे वाजले ‘बारा’ )

संस्थेच्या दुर्वा साळुंखेने काळजी घेत शनिवारी १० डिसेंबरला तिला स्वैरसंचारासाठी मुक्त केलं. मात्र ७ डिसेंबर रोजी वरळीत जखमी अवस्थेत आढळून आलेल्या नर अमूर फाल्कॉन पक्ष्याला संसर्गाची बाधा झाल्याने मृत्यू झाला. वरळीतील बस स्थानकाजवळ हा पक्षी चालताना धडपडत असल्याची तक्रार वाइल्डलाइफ वेल्फेअर असोसिएशनला करण्यात आली. या पक्ष्याला खूपच अशक्तपणा होता. तिच्या पोटाजवळील भागांवर शस्त्रक्रियाही झाली. मात्र संसर्गामुळे हा नर पक्षी वाचू शकला नसल्याची खंत असोसिएशनचे स्वयंसेवक राज जाधव यांनी दिली.

अमूर फाल्कॉनबद्दल 

अमूर फाल्कॉन हा पक्षी रशियातील सायबेरियातून आपला प्रवास सुरु करतो. भारतात येण्याअगोदर चीनमध्ये काही काळ थांबतो. भारतात नागालंड राज्यात वास्तव्यास असताना तो तिथे अंडीही घालतो. म्हणून नागालंड राज्याने अमूर फाल्कॉनला राज्यपक्षी म्हणून घोषित केले आहे. त्यानंतरच्या तो थेट अरबी समुद्राकडे प्रयाण करतो. त्यामुळे पश्चिम किनारपट्टीवरील मुंबई व नजीकच्या भागांत हा हिवाळ्यात दिसून येतो. मुंबईहून तो दक्षिण आफ्रिकेत जातो. या संपूर्ण प्रवासात तो २२ हजार किलोमीटर एवढे अंतर पूर्ण करतो, असे वन्यजीव अभ्यासक आणि निसर्गतज्ज्ञ पंकज जाधव यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.