भारतातील सर्वात लहान तोफ India Book of Records मध्ये

161

भारतातील सर्वात लहान पितळी तोफ तुम्ही पाहिली आहे का? इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद झालेली आणि एका ग्रॅमच्या १४ भागाएवढे वजन आणि नखापेक्षाही लहान तोफेतून स्फोटकाचा मारा करण्याची ट्रायल यशस्वी झाल्यास या तोफेची लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्मध्ये नोंद होणार असल्याचे सांगितले जात आहे.

कोणी तयार केली ही लहानशी तोफ?

शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेले विठ्ठल गोरे यांनी जेमतेम बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. ते वैजापूर तालुक्यातील धोंदलगाव येथील असून त्यांनी औद्योगिक व्यवसायात पदार्पण केले. अभियंत्याची पदवी न घेताही त्यांनी आतापर्यंत ३०० यंत्रांचे भाग निर्माण केले आहेत. पेशाने मेटल डिझायनर असलेल्या विठ्ठल यांनी इतिहासाबद्दलचे प्रेम आणि गड किल्ल्यांवरील भटकंतीतून त्यांनी तोफ बनविण्याचा प्रयत्न केला असे सांगितले जात आहे की, पहिली २६ किलोची खरीखुरी, स्फोटकांचा मारा करू शकणारी तोफ बनविल्यावर त्यापेक्षा लहान तोफ बनवत त्यांनी जगातील सर्वात लहान तोफ बनवली.

६ मिलिमीटरची जगातील सर्वांत लहान तोफ

गिनीज बुकात जगातील सर्वांत लहान तोफ ६ मिलिमीटरची असून, विठ्ठल यांनी बनवलेल्या तोफेची लांबी ५ मिलिमीटर असून, उंची केवळ २.७ मिलिमीटर आहे. वजन केवळ १४० मिलिग्रॅम आहे. ही तोफ अस्सल तोफेप्रमाणे उडवताही येऊ शकते असे सांगितले जात आहे.

तब्बल ५१ वर्षांनंतर पुन्हा लहान तोफ 

देशात तब्बल ५१ वर्षानंतर पुन्हा लहान तोफ बनवण्यात आली आहे. हर्ने हल यांनी बनवलेली जगातील सर्वात लहान उडवता येण्यासारखी तोफ आहे. ती ६ मिलीमीटर लांब आणि ३ मिलीमीटर उंच आहे. तर यापूर्वी भारतात, जयपूर (राजस्थान) येथील कुंज बिहारी सोनी यांनी १९७१ मध्ये छोटी तोफ बनवली होती. ती ११ मिलीमीटर लांब तर ८ मिलीमीटर उंच तर १.२ ग्रॅम वजनाची आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.