पेट्रोल-डिझेल, दैनंदिन वापरात येणाऱ्या आवश्यक गोष्टींचे दर गगनाला भिडले असतानाच आता टोमॅटोच्या दरात सुद्धा दुपटीने वाढ झाली आहे. टोमॅटोचे दर तब्बल ५० ते ८० रुपये प्रतिकिलो झाले आहेत. इंधन दरवाढीचा परिणामुळे वाहतूक खर्च, मजुरीचा खर्च यात दिवसेंदिवस वाढ झाल्यामुळे ही दरवाढ करण्यात आली आहे. तसेच तापमानामुळे टोमॅटोचे उत्पादन कमी होत असून टोमॅटोची आवक ३० ते ४० टक्क्यांनी घटली आहे. त्यामुळे त्यांच्या दरात मोठी वाढ झाल्याची माहिती वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीतील अधिकाऱ्यांनी दिली आहे.
( हेही वाचा : कोकणात पहिला पाऊस…पर्यटक सुखावले )
वाढत्या तापमानाचा फटका
आठवड्यापूर्वी घाऊक बाजारात २० रुपये प्रति किलोने विकले जाणाऱ्या टोमॅटोच्या दरात अचानक दुपटीने वाढ झाली असून सद्यस्थितीला ५० ते ८० रुपये प्रति किलोने टोमॅटो विक्री केली जात आहे. राज्यातील वाढत्या तापमानाचा फटका टोमॅटोला बसला आहे. टोमॅटोची आवक घटल्याने किरकोळ बाजारात याचा फायदा घेऊन सर्रासपणे ग्राहकांकडून पैशांची लूट केली जात आहे.
मागील काही आठवड्यांपासून भाजीपालाही महागला आहे. सध्या घाऊक बाजारात फरसबी १०० रुपये प्रति किलो, फ्लॉवर घाऊक बाजारात १६ रुपये प्रति किलो तर किरकोळ बाजारात ४० ते ६० रुपये प्रति किलोने विकला जात आहे.
Join Our WhatsApp Community