जरा जपून! येत्या 4 दिवसात ‘ती’ येतेय….

94

ऑक्टोबर हिट संपली की, चाहूल लागते थंडीची. डिसेंबरच्या सुरूवातीला अवकाळी पावासामुळे थंडीची लाट आली होती. पण कालांतराने ती लाट ओसरली. पण आता मात्र येत्या ३ ते ४ दिवसांत भारतासह महाराष्ट्रातील तापमान कमी होईल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. यामुळे आता लोकांना खास थंडीसाठी कपाटातील उबदार कपडे पुन्हा बाहेर काढावे लागणार आहेत.

तापमान कमी होणार

लोक थंडीच्या मोसमाची आतुरतेने वाट पाहत असतात. येत्या 4-5 दिवसांत वायव्य व लगतच्या मध्य भारत व गुजरात राज्याच्या बहुतेक भागांत किमान तापमानात 2-4° अंश सेल्सिअसने घसरण होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. तसेच पुढील 4 दिवसांत पूर्व भारत – महाराष्ट्राच्या बहुतांश भागांत तापमान 2-3°  अंश सेल्सिअसने घसरेल असेही हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. त्यामुळे पुढील काही दिवसात कडाक्याची थंडी पडणार आहे.

( हेही वाचा : सततच्या घसरणीनंतर सोन्याला ‘झळाली’ ! वाचा, आजचा दर )

विदर्भातील कडाक्याची थंडी

विदर्भातल्या तापमानाचा पारा घसरला असून नागपूरचे तापमान १२.४°C असून नांदेड, परभणीतील तापमान १४°C आसपास आहे असे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. तर, राज्यात इतर भागात किमान तापमान १४-१६°C आहे. येत्या काही दिवसात विदर्भातही कडाक्याच्या थंडीचा अनुभव घेता येणार आहे.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.