अबब…भारतातील ‘त्या’ नदीचे पाणी काचेप्रमाणे पारदर्शक

138

नुकताच छठ पूजेच्या निमित्ताने देशाची राजधानी दिल्लीतून यमुना नदीचा फोटो समोर आला होता. या फोटोमध्ये यमुना नदीच्या दूषित पाण्यात महिला उभ्या राहून पूजा करताना दिसत आहेत. यानंतर सोशल मीडियावरुन केजरीवाल सरकारवर जोरदार टीका झाली. याशिवाय गंगा नदीच्या स्वच्छतेबाबतही देशात जोरदार राजकारण सुरू आहे. भारतातील प्रसिद्ध नद्यांची अशी स्थिती असताना, आज आम्ही तुम्हाला भारतात वाहणाऱ्या अशा एका नदीबद्दल सांगणार आहोत, त्या नदीचे पाणी पाहून तुम्ही थक्क व्हाल. ती नदी नसून काच आहे, असे भास तुम्हाला होईल.

photoGallery

नदीच्या आतील प्रत्येक वस्तू स्पष्टपणे दिसते

photoGallery 1या नदीचे पाणी इतके स्वच्छ आहे की, त्यावर चालणारी बोट हवेत तरंगत असल्याचे दिसते. या नदीचे चित्र पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. चित्रांमध्ये तुम्हाला नदीच्या पात्रात असलेले दगड स्पष्टपणे दिसत आहेत. या नदीच्या आतील प्रत्येक वस्तू स्पष्टपणे दिसते. नदी इतकी पारदर्शक आहे, की त्यात तुम्हाला तुमचा स्वतःचा चेहराही दिसतो.

photoGallery 3

भारताच्या जलशक्ती मंत्रालयाने या नदीचा फोटो ट्विट करून लिहिले, ‘जगातील सर्वात स्वच्छ नद्यांपैकी एक, उमंगोट नदी भारतात आहे. जणू बोट हवेतच आहे, पाणी खूप स्वच्छ आणि पारदर्शक आहे. आपल्या सर्व नद्या अशाच स्वच्छ असायला हव्या होत्या. मेघालयाच्या जनतेला सलाम, अशा आशयाचे हे ट्विट आहे.

उमंगोट नदी आशियातील सर्वात स्वच्छ गावाचा दर्जा असलेल्या मावलिनॉन्ग गावातून जाते. हे गाव भारत-बांगलादेश सीमेजवळ आहे. ही नदी बांगलादेशच्या आधी जैंतिया आणि खासी हिल्सच्या मधून वाहते.

photoGallery 4

नदीचे नाव उमंगोट नदी असले तरी मेघालयात ती डवकी नदी म्हणून प्रसिद्ध आहे. ही नदी शिलाँगपासून 100 किमी दूर वाहते. नदीजवळील दृश्येही अप्रतिम आहेत. पक्ष्यांचा किलबिलाट इथे सतत ऐकू येतो. याशिवाय नदीत पडणारी सूर्यकिरणे हृदयाला मोठा दिलासा देतात.

photoGallery 5

या नदीजवळ फिरण्यासाठी वातावरण खूप चांगले आहे. इथे आल्यावर डोंगरावरून वाहणाऱ्या पाण्याचा आवाज ऐकून कानाला आराम मिळतो. इथे जायचे असेल, तर नोव्हेंबर ते एप्रिल या कालावधीत यावे. यावेळी येथील हवामान भेट देण्यास योग्य आहे.

 (हेही वाचा :  महाराष्ट्रात हिवाळी पर्यटनासाठी टॉप ५ डेस्टिनेशन्स ! )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.