गणेशोत्सवात श्रीफळाला मोठी मागणी

140

तब्बल दोन वर्षांनी कोरोनाचे सावट दूर झाल्यानंतर आता राज्यभरात मोठ्या उत्साहाने गणेशोत्सव साजरा होत आहे. यंदा गणेशोत्सवात पूजा, तोरणांसाठी नारळाच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. एकट्या पुणे, मुंबई परिसरात उत्सव कालावधीत दररोज २० ते २५ लाख नारळांची विक्री होत आहे. किरकोळ बाजारात सध्या नारळाची किंमत २० ते ४० रुपये आहे.

( हेही वाचा : गणेश विसर्जनाच्या दिवशी पश्चिम रेल्वेवर धावणार ८ अतिरिक्त लोकल )

मुंबई – पुण्यात दररोज २० ते २५ लाख नारळांची विक्री

उत्सवाच्या काळात राज्यात पुणे आणि मुंबई या दोन शहरात नारळांची विक्री मोठ्या प्रमाणात होते. उत्सव सुरु होण्यापूर्वी ३ ते ४ दिवस आधी पुण्यातील मार्केट यार्ड तसेच नवी मुंबईतील वाशी बाजारात तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश येथून नारळांची आवक सुरू झाली. उत्सवावर कोणतेही निर्बंध नसल्याने हॉटेल व्यावसायिक, कॅटरिंग तसेच खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडून नारळांच्या मागणीत वाढ झाली आहे.

शेकडा नारळाचे दर

  • नवा नारळ – १२५० ते १४५० रुपये
  • पालकोल – १४०० ते १६०० रुपये
  • मद्रास – २५०० ते २७०० रुपये
  • सापसोल – १८०० ते २५०० रुपये
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.