थंडीच्या दिवसांमध्ये आवर्जून खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे डिंक होयं. डिंकापासून अनेक पौष्टिक पदार्थ बनवले जातात. डिंक हा आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असतो. डिंकामध्ये असलेले पोषकतत्वे आपल्या शरीराला ऊर्जा देतात. त्यामुळे, थंडीच्या दिवसांमध्ये डिंकाचे लाडू आवर्जून खाल्ले जातात. (Health Tips)
आयुर्वेदामध्ये डिंकाचे विशेष महत्व आहे. आयुर्वेदातील अनेक औषधांमध्ये डिंकाचा वापर आवर्जून केला जातो. जेव्हा झाडाचे खोड रस सोडू लागते आणि कालांतराने ते सुकते तेव्हा त्याचा डिंक बनतो.हा डिंक वाळल्यावर कडक आणि तपकिरी रंगाचा दिसतो. त्यामुळे, आपण ज्या झाडाचा डिंक खाणार त्या झाडाचे औषधी गुणधर्मही डिंकामध्ये येतात आणि याचे फायदे आपल्या आरोग्याला होतात. आज आपण डिंकाचे आरोग्याला होणारे फायदे कोणते ? ते जाणून घेणार आहोत.
(हेही वाचा : Health Tips : तुळशीच्या बियांचा आहारात वापर करा, ‘हे’ ५ फायदे होतील)
रोगप्रतिकारक शक्ती वाढते
डिंकामध्ये विविध प्रकारचे पोषकघटक, प्रथिने आणि फॉलिक अॅसिडचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे, डिंकाचे सेवन केल्याने आपल्या शरीराला भरपूर ऊर्जा मिळते आणि आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत मिळते
गरोदर महिलांसाठी लाभदायी
गरोदर महिलांसाठी डिंकाचे सेवन करणे हे लाभदायी मानले जाते. डिंकातील पोषकघटकांमुळे मांसपेशी मजबूत होण्यास मदत मिळते. त्यामुळे, गरोदर महिलांनी डिंकाचे सेवन करणे फायदेशीर मानले जाते. डिंकाचे लाडू खाल्ल्यामुळे पाठीचा कणा मजबूत होतो. त्यामुळे, गरोदर महिलांना डिंकाचा समावेश असलेल्या पदार्थांचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो.