Online Payment करताना या गोष्टी लक्षात ठेवा; एक चूक पडू शकते महागात

सध्या ऑनलाइन पद्धतीने रक्कम ट्रान्सफर करण्यावर भर दिला जातो. याचा खूप फायदादेखील होतो, वेळेची बचत होते. तसेच, बॅंक किंवा एटीएमध्ये जाण्याची गरज नाही. तसेच, पैसे ट्रान्सफर करताना, काळजी घेणे गरजेचे आहे. online money transfer करताना या गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

गुगलवर एकदा नंबर शोधा

जर तुम्ही एखाद्या अनोळखी व्यक्तीला पैसे पाठवत असाल, तर आधी गुगलवर त्याचे नाव आणि नंबर टाकून सर्च करा. त्याने पूर्वी कोणाची फसवणूक केली असेल, तर तुम्हाला त्याच्याबद्दल ऑलनाइन माहिती मिळण्याची शक्यता आहे. अशा प्रकराची फसवणूक झाल्यास लोक माहिती सोशल मीडियावर टाकतात.

UPI ऐवजी NEFT/ IMPS वापरा

UPI नि:संशयपणे पैसे पाठवण्याचा एक सुरक्षित आणि जलद मार्ग आहे. तुम्ही ज्याला पैसे पाठवणार आहात तो जर UPI वर असेल तर त्याच्याकडून बॅंक खाते, नाव, IFSC कोड इत्यादी घ्या आणि NEFT/ IMPS द्वारे पैसे ट्रान्सफर करा. यामुळे तुम्हाला त्या व्यक्तीबद्ल अधिक माहिती मिळेल आणि तुमची फसवणूक होणार नाही.

( हेही वाचा: पहिल्या महायुद्धात पहिले लढाऊ विमान उडाले हे सांगणारी तार अशी झाली हद्दपार )

घाईत पैसे ट्रान्सफर करु नका

जर तुम्ही घाईत पैसे ट्रान्सफर केले तर तुमच्याकडून चूक होण्याची शक्यता आहे. विशेषत: जेव्हा तुम्ही मोठी रक्कम ट्रान्सफर  करता तेव्हा तुम्हाला अधिक सावध राहण्याची गरज असते.

पूर्ण पैसे पाठवण्याऐवजी आधी आगाऊ पैसे ट्रान्सफर करा

बहुतेक वेळा लोक अगदी अनोळखी लोकांवर सहज विश्वास ठेवतात. OLX सारख्या वेबसाईटच्या माध्यमातून अनेक लोक फसवणूक करतात. अशा वेळी तुम्ही समोरच्या व्यक्तीला थोडे अॅडव्हान्स पैसे ट्रान्सफर करा.

Truecaller वर एकदा सर्च करा

फक्त Truecaller च्या शोधाच्या आधारे तुमचे निर्णय घेऊ नका, परंतु जर तुम्ही UPI पेमेंट करणार असाल, तर हे खूप उपयुक्त ठरु शकते. Truecaller वर तुम्ही त्या व्यक्तीचे नाव आणि कंपनीचे नाव पाहू शकता.

जीएसटी क्रमांक घ्या

कोणत्याही कंपनीला पेमेंट करायचा असेल, तर त्यांच्याकडून जीएसटी क्रमांक मागवा. ती कंपनी खरी आहे की नाही हे GST क्रमांकावरुन प्रत्येकाला चुटकीसरशी कळेल.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here