Healthy tips : या’ भाज्यांमुळे फुफ्फुस होईल निरोगी, श्वसनाचे आजार होतील दूर

239
Healthy tips : या' भाज्यांमुळे फुफ्फुस होईल निरोगी, श्वसनाचे आजार होतील दूर
Healthy tips : या' भाज्यांमुळे फुफ्फुस होईल निरोगी, श्वसनाचे आजार होतील दूर

शरीर निरोगी राहण्यासाठी शरीरातील प्रत्येक अवयवाचं कार्य सुरळीतपणे चालणं आणि प्रत्येक अवयव निरोगी असणं गरजेचं आहे. तुमचं हृदय, मेंदू, किडनी, यकृत आणि फुफ्फुस हे अवयव निरोगी आणि हेल्दी असल्यास तुम्ही देखील नक्कीच हेल्दी रहाल. या अवयवांपैकीच एक महत्वाचा अवयव म्हणजे फुफुसे . तुमच्या शरीराला आवश्यक असलेल्या ऑक्सिजनचा पुरवठा योग्य प्रकारे व्हावा यासाठी फुफ्फुस निरोगी असणं गरजेचं आहे. फुफ्फुस हे केवळ हवेतील ऑक्सिजनच ओढून घेत नाही तर हवेतील इतर हानिकारक वायू किंवा तत्व शोषून घेत असतं. या हानिकारक गोष्टींमुळे दमा, ब्रोंकाइटिस, सिस्टिक,पायब्रोसिस आणि न्युमोनिया सारखे श्वसनाचे विकार होण्याचा धोका वाढतो. (Healthy tips)

बदललेली जीवनशैली, पर्यायावरणातील बदल आणि वाढतं प्रदूषण तसंच अयोग्य आहारामुळे गेल्या १० वर्षांमध्ये फुफ्फुसासंबंधीत समस्यांमध्ये वाढ होत आहे. तसंच कोरोना महामारीनंतर फुफ्फुसांच्या विकारांमध्ये वाढ झाल्याचं काही अभ्यासांमध्ये आढळून आलं आहे. त्यामुळे फुफ्फुस निरोगी ठेवण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे.फुफ्फुस निरोगी ठेवण्यासाठी व्यायाम करणं आणि पोषक तत्त्वं असलेला आहार घेणं अत्यंत गरजेचं आहे.

यासाठी तुम्ही आहारामध्ये काही अशा भाज्यांचा समावेश करू शकता ज्यामुळे फुफ्फुस निरोगी राहण्यास मदत होईल.
१. ब्रोकोली – एकेकाळी केवळ विदेशी भाजी म्हणून ब्रोकोलीकडे पाहिलं जातं होतं. मात्र गेल्या काही वर्षात भारतातही ब्रोकोलीची लागवड मोठ्या प्रमाणात वाढल्याने ब्रोकोली बाजारात अगदी सहज उपलब्ध होते. आरोग्यासाठी ब्रोकोलीचे अनेक फायदे आहे.
२. भोपळा – खरं तर भोपळा या भाजींचं नाव ऐकताच अनेकजण नाक मुरडतात. मात्र याच भोपळ्यामुळे तुमचं फुफ्फुस निरोगी होवू शकतं. भोपळ्यामध्ये कॅरोटेनॉइड्स मुबलक प्रमाणात आढळून येतात. यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि अँटीइंफ्लेमेटरी गुण आढळतात. भोपळ्याची भाजी आणि बियांच्या सेवनामुळे फुफ्फुस निरोगी आणि हेल्दी राहण्यास मदत होते.
३. टोमॅटो – टोमॅटो हे लायकोपीनचं एक उत्कृष्ट वनस्पीती स्त्रोत आहे. टोमॅटोच्या सेवनामुळे फुफ्फुसाचं आरोग्य चांगलं राहण्यास आणि श्वसनमार्गातील सूज कमी होण्यास मदत होते. त्यामुळे टोमॅटोचा स्वयंपाकासाठी तसंच सलाडमध्ये समावेश करावा.
४. पालेभाज्या – पालेभाज्या खास करून केळं, पालक अशा भाज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम, आयर्न, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन उपलब्ध असतात. या पोषक तत्वांमध्ये मोठ्या प्रमाणात अँटीइंफ्लेमेटरी आणि अँटीऑक्सिडंट्स गुण असतात. यामुळे फुफ्फुसांमधील सूज कमी होण्यास मदत होते.
याचा वापर करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.