हल्ली अशा बातम्या समोर येत आहेत की हॉटेल रूममध्ये छुपा कॅमेरा वापरून हॉटेलमध्ये थांबणाऱ्या लोकांचे वैयक्तिक जीवन रेकॉर्ड करून व्हायरल केले जातात किंवा रेकॉर्ड केलेल्या टेप्स दाखवून त्या लोकांना पैसे देण्यासाठी ब्लॅकमेल केले जाते. ब्लॅकमेल करणाऱ्या लोकांना पैसे नाही दिले तर रेकॉर्ड केलेल्या टेप्स व्हायरल करण्याची धमकी देण्यात येते. या अशा कितीतरी घटना देशभरात घडत असतात.
यांपैकी कोणतीही गोष्ट तुमच्यासोबत घडू नये याकरिता तुम्ही आधीच काळजी घ्यायला हवी. या लेखामध्ये आम्ही तुम्हाला हॉटेलमध्ये रूम बुक करून राहत असाल तर तुम्ही सर्वात आधी कोणती काळजी घ्यायला हवी तसेच हॉटेलरूममध्ये लपलेला छुपा कॅमेरा कसा शोधून काढावा हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. चला तर मग…
हॉटेलरूम मधल्या छुप्या कॅमेराला शोधून काढण्यासाठी तुम्हाला आम्ही सांगितलेल्या काही टिप्स फॉलो कराव्या लागतील. हॉटेलरूममध्ये असे काही पॉईंट्स असतात जिथून संपूर्ण रूम दिसू शकते. तुम्हाला सर्वात आधी असे पॉईंट्स शोधून काढायचे आहे. त्यानंतर त्या ठिकाणी अशा वस्तू आहेत का, ज्यामध्ये लहान कॅमेरा सहजपणे लपवून ठेवता येऊ शकतो. तसे काही तुम्हाला सापडले तर लगेचच ते तिथून काढून टाका.
(हेही वाचा – Iqbal Singh Chahal : महापालिका आयुक्त चहल म्हणतात, पाणी तुंबले नाही नालेसफाई झाल्याचा पुरावा)
तसेच त्या रूममध्ये आरसा चुकीच्या ठिकाणी तर नाही ना ते व्यवस्थित पाहा. बेडच्या वर असणारा पंखा चेक करा. जर पंख्याच्या मध्यभागी बारीकशी लाल लाईट चमकत असेल तर तिथे कॅमेरा असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच त्या रूममधील दरवाजे चेक करा. दरवाज्यांच्या हँडलमध्येही कॅमेरा लपवून ठेवलेला असू शकतो.
जर तुम्हाला यांपैकी कुठेही कॅमेरा सापडला नाही तर त्या रूमची लाईट बंद करून पूर्णपणे अंधार करा. त्या अंधारात तुम्हाला कॅमेऱ्याची लाल लाईट दिसू शकेल किंवा अंधारात मोबाईल टॉर्चने कॅमेऱ्याच्या लेन्सवर पडणारे रिफ्लेक्शन पाहून तुम्ही नक्कीच कॅमेरा शोधून काढू शकता. आम्हाला खात्री आहे की, आम्ही सांगितलेल्या या खास टिप्स वापरून तुम्ही तुमचे वैयक्तिक आयुष्य धोक्यात येण्यापासून नक्कीच वाचवू शकता.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community