कामाठीपुरातील राहणीमान ‘सुधारणार’!

96

तेलंगणातून कामाठींना मुंबईत आणले गेले. त्यानंतर ते ज्या भागात राहू लागले त्याला कामाठीपुरा म्हणून ओळखला जाऊ लागले. येथील शरीरविक्रय करणाऱ्या महिलांमुळे या विभागाकडे बघण्याचा दृष्टीकोन लोकांना बदलला. मात्र, आता या संपूर्ण परिसराचे रूपडं बदलणार असून या विभागाल अर्बन व्हिलेज: कामाठीपुरा टाऊनशिप म्हणून ओळखले जाणार आहे. त्यामुळे आता कामाठीपुरातील राहणीमान सुधारणार आहे. दक्षिण कामाठीपुरा क्षेत्रात 15 गल्ल्यांमधील साधारण 530 उपकरप्राप्त इमारती असून त्या तब्बल 100 वर्षे जुन्या असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, यासंदर्भात बोलताना गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कामाठीपुऱ्याचा पुनर्विकास करण्याचा निर्णय अंतिम झाल्याची माहिती दिली आहे.

अशी होती शरीरविक्रय करणाऱ्या महिलांची मागणी

इंग्रजांच्या काळात उभी राहिलेली वसाहत म्हणजे कामाठीपुरा. याचा एकूण परिसर हा ३९ एकराचा असून मुंबई सेंट्रल, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, भायखळा अशी मोक्याची ठिकाणे कामाठीपुराच्या जवळ आहेत. या भागाचा विकास झाल्यावर तब्बल साडेतीन कोटी स्क्वेअर फूट बांधकाम तयार होणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे मुंबईच्या घरांच्या किमतीचा प्रश्न निकाली निघणार आहे. या भागाचा विकास व्हावा म्हणून येथील महिलांनी सतत मागणी केली होती, असे आव्हाड यांनी सांगितले. या ठिकाणी राहणाऱ्या ८ हजार कुटुंबांना नवे घर मिळणार असल्याने त्यांचे राहणीमान आता सुधारणार आहे.

(हेही वाचा – भाजप कार्यकर्त्यांविषयी ‘तो’ अपशब्द वापरणं राऊतांना पडलं भारी, दिल्लीत गुन्हा दाखल)

असं बदलणार कामाठीपुऱ्याचं रुपडं!

विक्रीसाठीच्या इमारती आणि पुनर्वसनासाठीच्या इमारती पुर्नविकासाची रचना अशी असणार आहे. मिनी क्रिकेट ग्राऊंड, थीम पार्क, क्लब हाऊस, उद्यान, व्यायामशाळा, जॉगिंग पार्क, लहान मुलांसाठी खेळाचे मैदान, अॅम्फीथिएटर, कार पार्किंग, दुचाकी पार्किंग, सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प, उत्तम गुणवत्तेचे सरकते जिने, रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प, सोसायटी ऑफिस, बोअर वेल, अत्याधुनिक अग्निशमन यंत्रणा, पोडियम पाकिंग अशी या पुनर्विकास प्रकल्पाची वैशिष्ट्ये आहेत.

  • इमारतीचे फ्रेम स्ट्रक्चर आर. सी. सी. असणार आहे.
  • किचन, शौचालय, बेडरूम, हॉल लक्षवेधी असेल.
  • घरांमधील विद्युत यंत्रणा उच्च दर्जाची असण्यासह प्रत्येक विद्युत उपकरणाकरिता वेगळा लाइट पॉइंट असणार आहे.
  • रंगरंगोटीसाठी सिमेंट पेंट व ऑइल बाँड डिस्टेंपरचा वापर.
  • महापालिकेच्या गरजेनुसार जलक्षमता असणार आहे.
  • इमारतीच्या लिफ्ट स्वयंचलित असणार आहेत.
  • सेफ्टी ग्रिलदेखील पुरविण्यात येणार आहेत.
  • येथील भूखडाचा जीआयएस सर्व्हे करण्यात आला आहे. अंतिम क्षेत्रफळ म्हाडाकडून प्रमाणांकित करून घेतले जाणार आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.