व्हॉट्सअप, फेसबुकला मागे टाकत ‘हे’ बनलं जगातील नंबर-१ अॅप!

शॉर्ट व्हिडिओ तयार करण्यासाठी सर्वाधिक युजर्स असणारं अॅप्लिकेशन म्हणजे टिकटॉक. मात्र सोशल मीडियावर सर्वाधिक युजर्स असणाऱ्या अॅप्लिकेशनच्या शर्यतीत टिकटॉक हे जगभरात सर्वाधिक वापरले जाणारे नॉन-गेमिंग अॅप बनले आहे. सेन्सर टॉवरने दिलेल्या ऑक्टोबरच्या अहवालानुसार, टिकटॉक ऑक्टोबर 2021 मध्ये 5.7 कोटीहून अधिक युजर्सनी इनस्टॉल केले आहे. चीनमधील Douyin मध्ये सर्वाधिक युजर्स असलेलं टिकटॉक हे अॅप असून त्या ठिकाणी साधारण 17 टक्के युजर्सने हे अॅप डाऊनलोड केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चीननंतर अमेरिकेत टिकटॉकला सर्वाधिक डाउनलोड केले गेले आहे. भारतात टिकटॉक अॅपच्या वापरावर पूर्णपणे बंदी असली तरी जगातील सर्वाधिक वापरले जाणारे अॅप टिकटॉक बनले आहे. मात्र या अॅप्लिकेशनला कोणताही भारतीय वापरू शकत नाहीत.

टिकटॉकनंतर इंस्टा दुसऱ्या स्थानी

त्यानंतर जगभरात सर्वाधिक डाउनलोड केलेल्या अॅप्सच्या यादीत इंस्टाग्राम दुसऱ्या क्रमांकावर आहे. गेल्या महिन्यात इंस्टाग्राम 5.6 कोटीहून अधिक वेळा डाउनलोड केले गेले, जे गेल्या वर्षी 2020 च्या ऑक्टोबर महिन्यापेक्षा साधारण 31 टक्के जास्त आहे. ऑक्टोबर 2021 मध्ये ज्या देशाने सर्वात जास्त इंस्टाग्राम अॅप इनस्टॉल केले होते त्या देशाच्या यादीच भारताचे नाव पहिल्या स्थानी आहे. जगभरात, 39 टक्के इंस्टाग्राम भारतात डाउनलोड करण्यात आले आहे. त्यापाठोपाठ ब्राझीलचा क्रमांक लागतो. जर आपण टॉप-5 डाउनलोडिंग अॅप्सबद्दल बोललो तर, टिकटॉक आणि इंस्टाग्रामनंतर, फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि टेलिग्राम हे जगातील टॉप-5 नॉन-गेमिंग अॅप्समध्ये येतात.

(हेही वाचा – वाहनचालकांसाठी काळरात्र! राज्यभरात सायंकाळी ६ ते ९ वेळात सर्वाधिक अपघात)

जगातील अव्व्ल असणारे 5 नॉन गेमिंग अॅप्स

  1. टिकटॉक
  2. इंस्टाग्राम
  3. फेसबुक
  4. व्हॉट्सअॅप
  5. टेलीग्राम

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here