tikona fort : तिकोना किल्ला का आहे इतका प्रसिद्ध?

81
tikona fort : तिकोना किल्ला का आहे इतका प्रसिद्ध?
तिकोना किल्ल्याची वैशिष्ट्ये

तिकोना किल्ला (tikona fort) हा वितंडगड या नावानेही ओळखला जातो. हा पश्चिम भारतातल्या मावळ प्रांतामधला एक मजबूत डोंगरी किल्ला आहे. हा किल्ला पुण्यापासून सुमारे ६० किलोमीटर एवढ्या अंतरावर कामशेत या ठिकाणाजवळ आहे. किल्ल्यापासून अगदी जवळ असलेल्या गावाचं नाव तिकोना पेठ असं आहे. या किल्ल्याची उंची सुमारे ३५०० फूट इतकी आहे. याच्या त्रिकोणी आकारामुळे या किल्ल्याला तिकोना किल्ला असं नाव पडलं.

या किल्ल्यावर पर्यटक ट्रेकिंग करायला येतात. इथे असलेले मोठे दरवाजे, त्र्यंबकेश्वर महादेवाचं मंदिर, सात पाण्याच्या टाक्या आणि काही सातवाहन काळातल्या लेण्या पर्यटकांना आकर्षित करतात. या तिकोना किल्ल्याच्या शिखरावरून पावना सरोवराचं विहंगम दृश्य पाहायला मिळतं.

(हेही वाचा – chaturbhuj temple : ओरछा येथील चतुर्भुज मंदिराबद्दल जाणून घ्या या महत्त्वाच्या गोष्टी!)

तिकोना किल्ल्याचा इतिहास

असं म्हटलं जातं की, निजाम शाही घराण्यातल्या मलिक अहमद निजाम शाह याने १५८५ हा किल्ला जिंकून निजामाच्या प्रदेशात सामील केला. १६५७ साली छत्रपती शिवाजी महाराजांनी कर्नाळा, लोहगड, माहुली, सोनगड, तळा आणि विसापूर या किल्ल्यांसोबतच तिकोना किल्ला जिंकून निजामाच्या ताब्यात असलेला संपूर्ण कोकण प्रांत स्वराज्यात सामील केला.

या किल्ल्यावरून पावना सरोवराजवळच्या संपूर्ण मावळ प्रदेशावर लक्ष ठेवता यायचं. १६६० साली ढमाले देशमुख कुटुंबावर मावळ प्रांतातल्या तिकोना किल्ल्याच्या सुरक्षेची जबाबदारी सोपविण्यात आली. ही जबाबदारी ढमाले देशमुख कुटुंबाने उत्तमरीत्या पार पाडली.

१६६५ साली जयसिंगने या प्रदेशावर आक्रमण केलं. इथल्या गावांवर हल्ला केला. अनेक किल्ले ताब्यात घेतले. पुढे १२ जून १६६५ साली झालेल्या पुरंदरच्या तहानुसार तिकोना किल्ला हा मुघलांच्या ताब्यात गेला. त्यावेळी कुबाद खान याने हलाल खान आणि इतर लोकांसोबत मावळ प्रांतावर हल्ला केला होता. तिकोना किल्ला (tikona fort)  तहाच्या वेळी मुघलांच्या ताब्यात गेलेला असला तरीही नंतरच्या काळात मराठ्यांनी मुघलांशी युद्ध करून तो पुन्हा स्वराज्यात सामील केला.

(हेही वाचा – ‘Ladki Bahin’ योजनेच्या प्रसिद्धीसाठी सरकार करणार तब्बल २०० कोटी रुपये खर्च)

तिकोना किल्ल्यावर कसं पोहोचायचं?

कामशेत हे तिकोना किल्ल्याच्या सर्वात जवळचं गाव आहे. हे गाव पुणे शहरापासून ५१ किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे. कामशेतपासून २६ किलोमीटरच्या अंतरावर तिकोना पेठ हे गाव लागतं. तिकोना पेठ हे किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेलं गाव आहे. कामशेत या गावामध्ये चांगले हॉटेल्स आहेत. पण हल्ली तिकोना पेठ आणि काळे कॉलनी इथल्या छोट्या हॉटेल्समध्येही चहा-नाश्ता मिळतो.

तिकोना पेठेजवळच्या पार्किंग एरियाच्या दक्षिणेकडच्या टेकडीपासून ट्रेकिंगचा मार्ग सुरू होतो. हा मार्ग सुरक्षित आणि रुंद आहे. ट्रेकिंगच्या मार्गावर झाडांचं प्रमाण कमी आहे. किल्ल्याच्या (tikona fort)  प्रवेशद्वारापर्यंत पोहोचण्यासाठी ट्रेकर्सना जवळजवळ एक तास लागतो. तिकोना किल्ल्याच्या उंचीमुळे चढाईचा अनुभव अधिकच रोमांचक होतो.

किल्ल्यामध्ये जागा फारच कमी आहे. या गडावर ट्रेकिंगला जाण्यासाठी ट्रेकर्सना लहान ग्रुप सोबतच जाण्याचा सल्ला दिला जातो. किल्ल्याच्या पायऱ्या इतक्या अरुंद आहेत की, एका वेळी एकच माणूस त्यावरून चढू शकतो. तिकोना किल्ल्यावर रात्रीचा मुक्काम किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळच्या गुहेमध्ये किंवा किल्ल्याच्या माथ्यावर करता येतो. तिकोना पेठेतले स्थानिक किल्ला जीर्णोद्धार समितीचे ग्रामस्थ माफक दरात रात्रीच्या मुक्कामाची आणि जेवणाची सोय करून देतात. कामशेतहून ट्रेकिंगसाठी निघाल्यावर किल्ल्याच्या वाटेवर असलेल्या बेडसे लेण्यांनाही त्याच दिवशी भेट देता येते.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.