बिबट्याचे संवर्धन ही काळाची गरज!

वन संरक्षणाविषयी जागरूकता, वन्यजीवनाचे वर्तन आणि निसर्ग या सर्व विषयांवर शिक्षण देणे महत्वाचे आहे. त्यादृष्टीने सातत्याने शैक्षणिक आणि जागरूकता मोहिमा राबवाव्यात.   

वैशिष्ट्ये

शास्त्रीय नाव – पँथेरा पारडस

सामान्य नाव – बिबट्या

स्थान – आफ्रिका आणि आशिया

आवास – रेनफॉरेस्ट, गवताळ प्रदेश आणि डोंगराळ  प्रदेश

आयुष्य – 10 – 15 वर्षे

सर्वात मोठा धोका – निवास कमी होणे, कातडी, दात, नखे यांसाठी शिकार

सर्वाधिक वैशिष्ट्ये – तीक्ष्ण दात

मजेदार तथ्य – झाडांवर जास्त वेळ घालवतो

बिबट्याच्या संरक्षणासाठी आव्हाने

बिबट्याच्या संवर्धनामधील मोठे आव्हान म्हणजे लोकांना जास्तीत जास्त सहिष्णुता आणि कमी भीती असलेल्या बिबट्याबरोबर सहवास असणे आवश्यक आहे, याची खात्री पटवणे. वन वसाहतींमध्ये बहुतांश वस्ती बेकायदा अतिक्रमण असल्याने मूलभूत सुविधा उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे योग्य स्वच्छता नसणे, वीज, शाळा, पाणीपुरवठा इत्यादी नसणे अशा अनेक समस्या असतात. अशा परिस्थितीत ते जंगलातील वातावरण, शांतता भंग करतात, त्यांचा अनादर करतात आणि बिबट्याचे सोपे लक्ष्य बनतात. या अतिक्रमणांना सुविधा दिली जाऊ शकत नाही, कारण ती बेकायदेशीर आहेत, परंतु त्याच वेळी वनक्षेत्रात मानवी जीवनाची सुरक्षा सुनिश्चित करण्याची देखील तितकीच गरज आहे.

वन्यजीव रक्षणासाठी उपाययोजना! 

वन संरक्षणाविषयी जागरूकता, वन्यजीवनाचे वर्तन आणि निसर्गाच्या अनुषंगाने जगण्याची आवश्यकता व महत्त्व यासंबंधी शिक्षणास महत्त्व दिले पाहिजे. अशा सातत्यपूर्ण शैक्षणिक आणि जागरूकता मोहिमा राबवाव्यात. हे वनविभाग आणि आदिवासींचे / स्थानिक लोकांचे एक समान व्यासपीठ सुनिश्चित करून मानवी-बिबट्या संघर्षासंदर्भात प्रश्न चर्चेने सोडवले जाऊ शकतात. त्यामुळे मिळालेला अभिप्राय वनविभागाला दीर्घकालीन रणनीती आणि वन आणि वन्यजीव संवर्धित करण्यासाठी, मानवी जीवन सुरक्षित करण्यासाठी आणि मानवी-वन्यजीव संघर्ष कमी करण्यास मदत करु शकतो.

(हेही वाचा : गलुंगान आणि कुनिंगान : एक अभूतपूर्व सोहळा!)

बिबट्याचे संगोपन करणे, संवर्धन करणे गरजेचे!   

वन्यजीवन पर्यटनाचा ध्यास घेतलेले श्रीरंग सामंत असे सांगतात की, वन्य प्राण्यांमध्ये मला नेहमीच वाघ, सिंहाचे आकर्षण राहिले आहे आणि जेव्हा मी पर्यटन क्षेत्रात आलो आणि जग पाहण्याची संधी मिळाली त्याच वेळीस  भारतातही  फिरताना मी वाइल्डलाइफचा मागोवा घेताना. ताडोबा किंवा रणथंभोर अशा अभयारण्यांना भेटी देताना बिबट्या हा माझा आकर्षणाचा विषय राहिला आहे. बिबट्या पाहायची संधी मिळणे हा फार दुर्मिळ योगायोग म्हणावा लागेल. या जातीचे खऱ्या अर्थाने संगोपन करणे तसेच संवर्धन करणे हे आजच्या  काळात फार महत्वाचा आहे असे मला वाटते.

…तर संपूर्ण परिसंस्थेवर विपरीत परिणाम होतो! 

माझे मित्र आणि वनअधिकारी निलेश चांदोरकर यांच्या मते, निसर्गातील विविध सजीव, निर्जीव वस्तूंच्या परस्पर संबंधातून पर्यावरण, परिसंस्था साकारलेल्या असतात. पर्यावरण, परिसंस्था यातील प्रत्येक घटक एकमेकांवर जोडलेला असतो. उदाहरणार्थ अन्नसाखळी, परस्पर संरक्षण इ. यातील कोणताही एक घटक नष्ट झाला तर या बाबीचा संपूर्ण परिसंस्थेवर विपरीत परिणाम होत असतो. त्यामुळे परिसंस्थेतील एकूण संतुलन राखण्यासाठी कोणताही घटक पूर्णपणे नष्ट होऊ न देणे महत्वाचे असते. बिबट्या हा सुद्धा या परिसंस्थेचा अविभाज्य घटक आहे आणि म्हणूनच बिबट्याचे संरक्षण आणि संवर्धन हे पुढील पिढीसाठी अत्यावश्यक आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here