भारताची आर्थिक राजधानी असणाऱ्या मायानागरी मुंबईत चमचमीत खाद्य पदार्थांसाठी अनेक फूड स्टॉल, हॉटेल्स, रेस्टॉरंट फेमस आहेत. मायानागरी मुंबईत विदेशी खाद्यांसह भारतीय खाद्यपदार्थांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. तसेच मुंबईत मोठ्या प्रमाणात १००-१५० वर्ष जुन्या इराणी हॉटेल्सची संख्या जास्त प्रमाणात आहे. खिशाला परवडणाऱ्या बजेटसाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस भागातील सर्वोत्तम हॉटेल्स शोधणे हे एक कंटाळवाणे काम असू शकते. पण आम्ही येथे तुम्हाला काही पर्याय देणार आहोत ज्यांचा तुम्ही विचार करू शकता. (Hotels Near Cst Mumbai)
१) ताजमहाल पॅलेसः ताजमहाल हॉटेल पॅलेस हे मुंबईतील पंचतारांकित हॉटेलपैकी एक आहे. ताजमहाल हॉटेलची मुख्य इमारत टाटा समूहाने बांधली आहे. या हॉटेलची रचना ही इंडो-सारासेनिक शैलीत बांधली गेली आहे तसेच हे हॉटेल प्रथम १६ डिसेंबर १९०३ रोजी उघडण्यात आले आहे.
२) हॉटेल रेजीडेंसी फोर्टः हा हॉटेल लोकल फूडस् वर लक्ष केंद्रित करून असून, बजेट-फ्रेंडली आणि मध्यम श्रेणीच्या जेवणाच्या पर्यायांसाठी उत्तम हॉटेल म्हणून पाहिले जाते.
३) लिओपोल्ड कॅफेः मुंबईतील एक ऐतिहासिक स्थळ, लिओपोल्ड कॅफेमध्ये परवडणारे परंतु स्वादिष्ट भारतीय आणि कॉन्टिनेन्टल पदार्थांसाठी विशेष प्रसिद्ध आहे.
४) कियानी अँड कंपनीः पारशी पाककृतींसाठी प्रसिद्ध असलेले कियानी अँड कंपनी हे सी. एस. टी. मुंबईजवळील एक आकर्षक बजेट-फ्रेंडली हॉटेल आहे.
५) ब्रिटानिया अँड कंपनीः पारशी खाद्यपदार्थांसाठी आणखी एक प्रतिष्ठित ठिकाण, म्हणून ब्रिटानिया अँड कंपनी या उपहारगृहाकडे पाहिले जाते. या उपहारगृहात वाजवी दरात उत्कृष्ट जेवणाचा अनुभव ग्राहकांना मिळू शकतो.
६) कॅफे न्यूयॉर्कः छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस नजदीक हे कॅफे आहे. या कॅफेत भारतीय खाद्यपदार्थांसह चायनिस खाद्यपदार्थांसाठी फेमस आहे.
(हेही वाचा – Lok Sabha Election 2024: तिसऱ्या टप्प्यात ६१.४५ टक्के मतदान, सर्वाधिक मतदान आसाममध्ये )
७) बडेमिया: जर तुम्ही कमी खर्चात रस्त्यावरील स्वादिष्ट खाद्यपदार्थ शोधत असाल, तर बडेमिया हे उत्तम हॉटेल आहे. तोंडाला पाणी आणणारे चिकन कबाब आणि तंदुरी पदार्थांसाठी सर्वोत्तम ठिकाण आहे.
८) कॅफे एक्सेलसियोरः परवडण्याजोग्या पण चविष्ट स्नॅक्स आणि पेयांसाठी प्रसिद्ध असलेले कॅफे एक्सेलसियोर हे स्थानिक आणि पर्यटकांसाठी एक लोकप्रिय हॉटेल आहे.
९) श्री ठाकर भोजनालयः वाजवी दरात अस्सल शाकाहारी गुजराती थाळीसाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील श्री ठाकर भोजनालयाकडे हे सर्वोत्तम ठिकाण आहे.
१०) आयडियल कॉर्नर: हे बजेट-फ्रेंडली हॉटेल असून भारतीय खाद्यपदार्थासाठी तसेच चायनीस आणि कॉन्टिनेटल फूडसाठी या हॉटेलमध्ये ग्राहकांचा ओढा जास्त प्रमाणात असतो. जुन्या काळातील आकर्षित असं डायनिग टेबल या हॉटेलचे खास वैशिष्ट्य आहे. (Hotels Near Cst Mumbai)
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community