Top 10 IT Companies in India : या आहेत भारतातील नावाजलेल्या १० आयटी कंपन्या

Top 10 IT Companies in India : टीसीएस आणि इन्फोसिस यांच्याखेरीज भारतातील प्रसिद्ध आयटी कंपन्या जाणून घेऊया.

44
Top 10 IT Companies in India : या आहेत भारतातील नावाजलेल्या १० आयटी कंपन्या
  • ऋजुता लुकतुके

संगणक आणि इंटरनेटच्या शोधानंतर जगभरात खूप मोठे बदल झाले. टेक इंडस्ट्री उभी राहिली आणि नवं डिजिटल युग सुरू झालं. विशेष म्हणजे भारतीय अभियंत्यांनी जागतिक माहिती तंत्रज्जान क्षेत्रातही मोठी भूमिका बजावली आहे. जागतिक स्तरावरील सगळ्यात मोठी टेक कंपनी असलेल्या गुगलचे सीईओ सध्या सुंदर पिचाई हे एक भारतीय आहेत. तर मायक्रोसॉफ्टमध्येही सत्या नाडेला कार्यरत आहेत. एकूणच माहिती तंत्रज्जान क्षेत्रात भारताने आतापर्यंत मोठी मजल मारली आहे. (Top 10 IT Companies in India)

जागतिक कंपन्यांना टेक आणि आयटी सेवा पुरवणारी सगळ्यात मोठी बाजारपेठ म्हणून भारताकडे पाहिलं जातं. आणि जागतिक स्तरावरील काही टेक कंपन्या अशा आहेत, ज्यांची कर्मचारी संख्या मायदेशात कमी आणि भारतात जास्त आहे. या पार्श्वभूमीवर देशातील प्रमुख दहा आयटी कंपन्यांविषयी जाणून घेऊया. कंपनीचं एकूण भांडवल आणि कर्मचारी संख्या या निकषावर ही क्रमवारी केली आहे. आणि आकडेवारी ही २०२४ सालची आहे. (Top 10 IT Companies in India)

(हेही वाचा – Oval Maidan : असा आहे मुंबईतील ओव्हल मैदानाचा इतिहास!)

कंपनी

मुख्यालय

बाजार भांडवल

कर्मचारी संख्या

संस्थापक

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस)

मुंबई

१.६७ लाख कोटी रु.

४,८८,६४९

टाटा समुह

इन्फोसिस

बंगळुरू

१.०२ लाख कोटी रु

२,५९,६१९

नारायण मूर्ती, नंदन निलकेणी व इतर २

विप्रो

बंगळुरू

६४,३२५ कोटी रु

१,९७,७१२

अझिम प्रेमजी

एचसीएल टेक

नॉयडा

७६,३०६ कोटी रु

१,६८,९७७

शिव नादर

टेक महिंद्रा

पुणे

३८,६४२ कोटी रु

१,२५,२३६

आनंद महिंद्रा

एल अँड टी टेक

वडोदरा

२,६५० कोटी रु

२३,८१२

एल अँड टी समुह

ओरॅकल फायनान्शिअल सर्व्हिसेस

मुंबई

५,११५ कोटी रु

८,८१८

दीपक घैसास

एलटीआय माईंडट्री

मुंबई

१२,६४४ कोटी रु

१५,२१५

एल अँड टी

एमफसिस

बंगळुरू

३,५६० कोटी रु

३३,७७१

जेरी राव

गोदरेज इन्फोटेक

मुंबई

११,८०० कोटी रु

१२,०००

जमशेटजी गोदरेज

 

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.