बहुतेक वेळेस यश मिळवणं हे अगम्य वाटू शकतं. जर तुम्ही तुमची ध्येयं आणि स्वप्नं साध्य करण्यासाठी संघर्ष करत असाल, तर तुम्हाला हे जाणून घ्यायला हवं की, याआधीही आपल्या स्वप्नपूर्तीसाठी अथक प्रयत्न केले होते. त्या अथक प्रयत्नांनंतर ज्यांची स्वप्नं पूर्ण झाली त्यांनी, इतर लोकांना त्यांच्या अनुभवातून शिकता यावं म्हणून आपले सगळे अनुभव शब्दांकित केले. जे लोक आपल्या स्वप्नपूर्तीसाठी धडपडत आहेत किंवा आपल्या आयुष्यात सफलता मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत त्यांना या सफलतेच्या मार्गावर चालणं सुलभ होण्यासाठी काही पुस्तकं वाचायला हवीत. ही काही प्रोत्साहनपर पुस्तकं वाचल्यावर तुम्ही नक्कीच तुमचं ध्येय गाठू शकता. चला तर मग पाहुयात, ती कोणती पुस्तकं आहेत ते…
स्टीव्हन आर. कोवे यांचे ‘द 7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल’ :
हे पुस्तक १९९० साली पहिल्यांदा प्रकाशित झालं. ‘द 7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल’ हे पुस्तक वैयक्तिक यश मिळवण्यासाठी लिहिल्या गेलेल्या सर्वात प्रोत्साहनपर आणि प्रभावी पुस्तकांपैकी एक मानलं जातं. या पुस्तकाचं उद्दिष्ट तुम्ही जगाकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहता आणि कशाप्रकारे सगळ्या गोष्टींचा अर्थ लावता यांमध्ये योग्य तो मूलभूत बदल घडवून आहे. तसंच तुमचं वैयक्तिक आणि व्यावसायिक प्रभुत्व कशाप्रकारे संतुलित करावं जेणेकरून तुम्हाला तुमच्या आयुष्याच्या सर्व टप्प्यांवर यश मिळेल, हे या पुस्तकात सांगितलेलं आहे. (top 10 motivational books)
(हेही वाचा – ‘एआय’ आणि तंत्रज्ञान क्रांतीचे नेतृत्व महाराष्ट्र करेल; मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांचे विधान)
अॅटोमिक हॅबिट्स :
चांगल्या सवयी निर्माण करण्याचा आणि वाईट सवयी सोडण्याचा एक सोपा आणि सिद्ध मार्ग, लेखक जेम्स क्लियर यांनी या पुस्तकात मांडलेला आहे. लेखक जेम्स क्लियर हे मानवाला छोट्या छोट्या सवयी लावणे या विषयाचे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे प्रसिद्ध तज्ज्ञ आहेत. आपल्या या पुस्तकात त्यांनी चांगल्या सवयी विकसित करण्यासाठी आणि वाईट सवयी दूर करण्यासाठी तुम्ही काय करू शकता, याचं वर्णन केलं आहे. त्यांनी या पुस्तकात वर्णन केलेल्या टेक्निकमध्ये कामापासून ते खेळापर्यंत वैयक्तिक ध्येयं साध्य करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे अनुप्रयोग दिलेले आहेत.
गर्ल, स्टॉप अपोलाईझींग :
तुमची ध्येये स्वीकारण्यासाठी आणि ती साध्य करण्यासाठी लेखिका राहेल हॉलिस यांनी हे एक बिनधास्त आणि बेधडक विचारांचं पुस्तक लिहिलंय. लेखिका राहेल हॉलिस या एका कोट्यवधी डॉलर्सच्या मीडिया कंपनीच्या संस्थापक आहेत. त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक महिलांना स्वतःला कमी लेखताना पाहिलं आहे. महिलांना घरी किंवा कामावर किंवा इतर कुठेही कोणत्या ना कोणत्या बंधनांना, समस्यांना तोंड द्यावं लागतं हे त्यांनी पाहिलं. तसंच महिलांनी स्वतःवर टाकलेल्या बंधनांचाही समावेश यात आहेच. आयुष्य बदलून टाकणाऱ्या या पुस्तकामध्ये लेखिका, महिलांनी स्वतःला पराभूत करणाऱ्या वर्तनांवर मात कशी करावी हे सांगितलं आहे. (top 10 motivational books)
(हेही वाचा – Crime : आई आणि आजीनेच केली १७ वर्षांच्या मतीमंद मुलीची हत्या)
डेअर टू लीड :
ब्रेन ब्राउन नावाच्या लेखकाने एक यशस्वी नेता होण्यासाठी काय करावं लागतं? हे या पुस्तकामध्ये सांगितलं आहे.
ब्रेन ब्राउन यांनी ह्यूस्टन विद्यापीठात पीएचडी केलेली आहे. तसंच ते प्राध्यापकही आहेत. लहान स्टार्टअप्स आणि कौटुंबिक व्यवसायांपासून ते ना-नफा संस्था आणि फॉर्च्यून 50 कंपन्यांपर्यंतच्या संस्थांसाठी सल्लामसलत करतानाचे आपले अनुभव त्यांनी या पुस्तकात संकलित केले आहेत. या प्रभावशाली पुस्तकामध्ये लेखक ब्रेन ब्राउन हे लोकांना आपल्या करिअरची सुरुवात धैर्याने करायला सांगतात.
प्रिन्सिपल्स : लाईफ अँड वर्क, रे डालियो :
ब्रिजवॉटर असोसिएट्स या अत्यंत यशस्वी गुंतवणूक फर्मचे संस्थापक रे डालियो यांनी न्यू यॉर्क टाइम्स बेस्टसेलर पुस्तक लिहिलं आहे. या पुस्तकामध्ये एका सामान्य मध्यमवर्गीय मुलापासून ते उच्चभ्रू कार्यकारी अधिकारी होण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास आणि त्या प्रवासात ते काय शिकले याचं तपशीलवार वर्णन केलं आहे. या पुस्तकात त्यांनी व्यक्ती आणि संस्थांना अधिक प्रभावीपणे निर्णय घेण्याचे, आव्हानांना तोंड देण्याचे आणि मजबूत संघ तयार करण्याचे मार्ग सांगितले आहेत. (top 10 motivational books)
(हेही वाचा – gudi padwa wishes in marathi : गुढी पाडव्याला करा आपल्या आवडत्या व्यक्तीवर शुभेच्छांचा वर्षाव)
शू डॉग : अ मेमोइर बाय द क्रिएटर ऑफ नाईक :
फिल नाइट यांचं हे डोळे उघडणारं पुस्तक बिल गेट्स यांच्या पाच आवडत्या पुस्तकांपैकी एक म्हणून ओळखलं जातं. लेखकांनी त्यांच्या वडिलांकडून $50 कर्ज घेऊन जपानी रनिंग शूज आयात करण्यासाठी कंपनी सुरू केली. कंपनी सुरू करण्यासाठी आयुष्यात आलेल्या अनेक चढ-उतारांचं वर्णन त्यांनी या मेमोइरमध्ये केलेलं आहे. लेखक नाईट हे स्पष्ट म्हणतात की, यशाचा मार्ग सरळ आणि स्थिर नाही. पण यश मिळवण्यासाठी माणसाकडे दृढनिश्चय, चिकाटी आणि अपयशातून शिकण्याची तयारी असणं गरजेचं आहे.
बिग मॅजिक : क्रिएटिव्ह लिव्हिंग बियॉन्ड फियर :
एलिझाबेथ गिल्बर्ट यांचं बेस्टसेलर ठरलेलं “ईट, प्रे, लव्ह” हे पुस्तक तर सर्वज्ञात आहेच. एलिझाबेथ गिल्बर्ट या पुन्हा एकदा एक परिपूर्ण आणि सृजनशील जीवन कसं जगायचं याबद्दलचं हे पुस्तक घेऊन परतल्या आहेत. नव्या कलाकृती बनवू पाहणाऱ्या, कामाच्या आव्हानांना तोंड देण्याचे नवीन मार्ग शोधणाऱ्या, दीर्घकालीन स्वप्न साध्य करण्यासाठी निघालेल्या आणि यशस्वी होण्यापासून रोखणाऱ्या गोष्टींना तोंड देणाऱ्या प्रत्येक व्याक्तीसाठी त्यांनी या पुस्तकातून उत्तम मार्गदर्शन केलं आहे. (top 10 motivational books)
(हेही वाचा – happy birthday wishes in marathi : तुमच्या प्रियजनांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या आता आपल्या माय मराठीत)
फिअर इज माय होमबॉय : हाऊ टू स्ले डाउट, बॉस अप, अँड सक्सीड ऑन युअर ओन टर्म्स :
जुडी हॉलर यांचं हे प्रेरणादायी पुस्तक म्हणजे, जणू काही तुमचा हात धरून ठेवणारा वैयक्तिक प्रशिक्षक तुमच्या भीतींवर मात करण्यास प्रोत्साहित करतो तसंच आहे. या पुस्तकात त्यांनी लोकांना निष्क्रियतेत अडकवून ठेवणाऱ्या त्यांच्या आत्म-शंकेवर कशी मात करावी, या प्रमुख विषयावर मार्गदर्शन केलं आहे. आत्मविश्वासाभोवती गराडा घातलेल्या चिंतांशी कसं लढायचं हे त्यांनी अतिशय कुशलतेने मांडलं आहे. हे पुस्तक वाचल्यानंतर तुम्हाला जगाला तोंड देण्यासाठी तुम्ही तयार आहात हा आत्मविश्वास तुमच्यात नक्की निर्माण होईल.
इयर्स ऑफ येस : हाऊ टू डान्स इट आउट, स्टँड इन द सन अँड बी युअर ओन पर्सन :
शोंडा राइम्स या एक प्रचंड अंतर्मुखी व्यक्ती होत्या. त्यांना मीडिया मुलाखती देण्याच्या विचारानेच पॅनीक अटॅक येत होते. पण जेव्हा त्यांच्या बहिणीने त्यांना आव्हान दिलं तेव्हा राईम्सने त्या कशाप्रकारे जगत आहेत, यावर बारकाईने विचार केला आणि हे पुस्तक उदयास आलं. या प्रेरणादायी पुस्तकामध्ये त्यांनी आत्मसात केलेल्या ज्ञानाची सारी संपत्ती शेअर केली आहे. तसंच त्यांनी या पुस्तकात आयुष्याच्या संघर्षांमध्ये स्वतःला ओळखणाऱ्या प्रत्येकासाठी काही टिप्स देखील दिल्या आहेत. (top 10 motivational books)
(हेही वाचा – MSRTC च्या १४० जाहिरातींच्या जागा परस्पर केल्या हडप)
एव्हरीथिंग इज फिगरआउटेबल :
या पुस्तकाच्या लेखिका मेरी फोरलेओच्या आईने एकदा त्यांना सांगितलं होतं की, “आयुष्यात काहीही क्लिष्ट नसतं जे तुम्ही सोडवू शकत नाही. जर तुम्ही तुमचे मन निश्चयी केलं तर तुम्ही जे काही ठरवता ते सगळं करू शकता. सर्व काही फिगरआउटेबल आहे.”
या पुस्तकात हाच संदेश लेखिलेने सांगितला आहे. अडचणी, टीका आणि इम्पोस्टर सिंड्रोमच्या वाढत्या प्रकरणाचा सामना करताना तुमच्या मेंदूला पुन्हा कसं प्रशिक्षित करायचं ते या पुस्तकातून शिकायला मिळतं. (top 10 motivational books)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community