Top 10 Private Banks in India : भारतातील सगळ्यात मोठ्या १० खाजगी बँका कुठल्या आहेत?

Top 10 Private Banks in India : एचडीएफसी ही देशातील सगळ्यात मोठी खाजगी बँक आहे.

26
Top 10 Private Banks in India : भारतातील सगळ्यात मोठ्या १० खाजगी बँका कुठल्या आहेत?
  • ऋजुता लुकतुके

१९९१ मध्ये भारतीय अर्थव्यवस्था परकीय गुंतवणुकीसाठी खुली झाली आणि तिथपासून देशाचं उद्योग आणि त्याचबरोबर बँकिंग क्षेत्रही बदलत गेलं. कारण, नवीन उद्योजक आणि व्यावसायिकांच्या वाढत्या गरजांना पुरे पडेल अशा बँका देशात उभं राहणं महत्त्वाचं होतं. त्यातूनच देशातील खाजगी बँकिंग क्षेत्र विस्तारत गेलं. सरकारी बँकांबरोबरच देशात खाजगी बँका, बँकेतर वित्तीय संस्था व स्मॉल फायनान्स बँका उभ्या राहिल्या. (Top 10 Private Banks in India)

खाजगी बँकांना रिझर्व्ह बँकेचा परवाना आवश्यकच असतो. त्यांच्यावर रिझर्व्ह बँकेचं पूर्ण नियंत्रण असतं. पण, त्या खाजगी संस्था किंवा व्यक्तींनी पुढे येऊन स्थापन केलेल्या असतात. त्यांचे नियम सरकारी क्षेत्रातील बँकांपेक्षा शिथील असतात. आणि सेवा चांगली असते. (Top 10 Private Banks in India)

(हेही वाचा – Pollution Board : मुंबईतील मलजल प्रक्रिया केंद्रांचा प्रदूषण मंडळाकडून आढावा)

आता शेअर बाजारातील भाग भांडवलाच्या आधारे देशातील मोठ्या १० खाजगी बँका पाहूया :

एचडीएफसी बँक – १९९४ साली या बँकेची स्थापना झाली आहे. ही बँक भारतातील सगळ्यात मोठी आणि जगातील सहावी मोठी बँक आहे. सुरुवातीला गृह कर्ज ही या बँकेची खासियत होती. किरकोळ गुंतवणूकदारांबरोबरच बांधकाम व्यावसायिकांना प्रकल्पांसाठी कर्ज देण्याच्या उद्देशाने ही बँक स्थापन झाली. पण, हळू हळू सेवांचा विस्तार होत गेला. आणि सध्या आधुनिक तंत्रज्जानाच्या वापरामुळे लोकांमध्ये लोकप्रिय असेलली ही बँक आहे.

आयसीआयसीआय – बँकिंग सेवांबरोबरच मालमत्ता व्यवस्थापन आणि परदेशातींल आर्थिक व्यवहार करण्याच्या दृष्टीने ही बँक चांगली सेवा देते, असा बँकेचा लौकिक आहे. भारतात अगदी सुरुवातीला स्थापन झालेल्या खाजगी बँकांपैकी ही महत्त्वाची बँक आहे.

ॲक्सिस बँक – १९९३ मध्ये ॲक्सिस बँकेची स्थापना झाली आणि देशातील एक मोठी ग्राहक संख्या असलेली बँक असा तिचा लौकिक आहे. त्याचबरोबर आयसीआयसीआय प्रमाणेच दुसऱ्या व तिसऱ्या श्रेणीच्या शहरांमध्ये शाखा असलेली ही बँक आहे. (Top 10 Private Banks in India)

कोटक महिंद्रा बँक – बँकेतर वित्तीय संस्था ते खाजगी बँक असं मोठं स्थित्यंतर या बँकेनं २००३ मध्ये केलं आहे. उद्योगांना कर्ज देण्याच्या बाबतीत ही बँक सुरुवातीपासून आघाडीवर आहे. आता बँकेनं किरकोळ गुंतवणूकदारांनाही आकर्षित करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत.

(हेही वाचा – Apar Industries Share Price : जानेवारी महिन्यात या शेअरच्या किमतीत ३० टक्क्यांची घसरण)

आयडीबीआय बँक – ही खाजगी बँकांमधील सगळ्यात जुनी म्हणजे १९६४ मध्ये स्थापना झालेली बँक आहे. पण, सुरुवातीला बँकेचा पसारा हा नावाप्रमाणेच औद्योगिक क्षेत्रात होता. पण, हळू हळू या बँकेनं सार्वजनिक क्षेत्रातील वित्तीय संस्था ते बँकिंग सेवा देणारी संस्था असा प्रवास केला आहे. आता बँकिंग क्षेत्रातील हे एक मोठं नाव आहे.

येस बँक – २००४ मध्ये स्थापना झालेली ही बँक अलीकडेच आर्थिक दृष्ट्या अडचणीत आली होती. पण, आता त्यातून ती सावरत आहे. खात्यातील पैसे आणि मुदतठेवींवर ६ टक्के व्याज देणारी योजना आणून २००० च्या दशकात येस बँकेनं मोठी हलचल निर्माण केली होती. आक्रमक विपणनासाठी ही बँक ओळखली जाते.

फेडरल बँक – १९३१ म्हणजे स्वातंत्रपूर्व काळात या बँकेची स्थापना झाली आहे. पण, सुरुवातीला फक्त दक्षिण भारतात या बँकेनं लक्ष केंद्रीत केलं होतं. त्यातही केरळमध्ये बँकेच्या सर्वाधिक शाखा होत्या. आता बँकेनं पश्चिम आणि उत्तर भारतातही विस्तार केला आहे.

इंडसइंड बँक – हिंदुजा समुहाने १९९४ मध्ये या बँकेची स्थापना केली. तेव्हापासून त्यांच्याकडेच बँकेची संपूर्ण मालकी आहे. कंपनीच्या आता देशभरात १००० हून अधिक शाखा आहेत. (Top 10 Private Banks in India)

(हेही वाचा – Union Budget 2025 : सर्वसमावेशी आणि विकसित भारताच्या दिशेने मार्गक्रमण करणारा अर्थसंकल्प – मुरलीधर मोहोळ)

रत्नाकर बँक – रत्नाकर बँकेची स्थापना १९४३ ची आहे. पण, २०१४ मध्ये बँक आरबीएल नावाने रिब्रँड झाली. देशभरात पसरलेलं जाळं हे या बँकेचं मोठं वैशिष्ट्य आहे.

जम्मू अँड काश्मीर बँक – ही बँक मूळातच जम्मू व काश्मीर भागातील लोकांच्या हितासाठी स्थापन झालेली आहे आणि या बँकेनं त्याच भागात काम करणं अपेक्षित आहे. तिथले स्थानिक कारागीर, उद्योजक तसंच किरकोळ ग्राहक यांना बँकिंग प्रणालीत आणणं हे बँक स्थापनेमागचं मुख्य कारण होतं. आता ही बँक या राज्यात आणि राज्याबाहेरही पसरली आहे. सेवांचा महत्त्वाचा केंद्रबिंदू जम्मू व काश्मीर हे राज्य असलं तरी तिथल्या मक्तेदारीमुळे ही बँक देशातील अग्रगण्य बँकांमध्ये एक गणली जाते.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.