Bungee Jumping करण्यासाठी भारतातील टॉप ५ ठिकाणे… जाणून घ्या दर

काही जणांना शांत ठिकाणी सुट्टीचा आनंद घ्यायला आवडतो तर काही लोकांना साहसी खेळ म्हणचे अ‍ॅडव्हेंचर स्पोर्ट्समध्ये सहभागी होण्याची इच्छा असते. सुट्टीत काहीतरी हटके करायचा प्रत्येकाचा प्रयत्न असतो. अलिकडे बंजी जंपिंग (bungee jumping) करायचे हे प्रत्येकाच्या ट्रॅव्हल यादीत पहिल्या क्रमांकावर असते. त्यामुळे तुम्हालाही बंजी जंपिंग आवडत असेल किंवा पहिल्यांदाच काहीतरी हटके काही ट्राय करायचे असेल. तर तुम्ही खालील जागांवर बंजी जंपिंग नक्की ट्राय करू शकता.

( हेही वाचा : मोबाईल डेटा लवकर संपतोय? लगेच बदला या सेटिंग्ज )

इंटरनॅशनल एक्सपर्टच्या मार्गदर्शनाखाली देशात अनेक ठिकाणी Bungee Jumpingचा अनुभव घेता येतो. त्यापैकी काही ठिकाणांची माहिती घेऊया…

ऋषिकेश

उत्तराखंडमध्ये ऋषिकेशच्या मोहन चट्टीमध्ये एक बंजी जंपिंग स्पॉट आहे. या ठिकाणी बंजी जंपिंगसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. ऋषिकेशचे बंजी जंपिंग जमिनीपासून ८३ मीटर उंच आहे. येथे जंप करण्याचे भाडे ३ हजार ५५० रुपये आहे. तुम्ही बार्गेनिंग करू शकता.

जगदलपूर

छत्तीसगडच्या जगदलपूरमध्ये बंजी जंपिंग स्पॉट आहे. याठिकाणी जंपिंगचे अंतर जमिनीपासून केवळ ३० मीटर आहे त्यामुळे याठिकाणी बंजी जंपिंग करण्यासाठी फारसा खर्च येत नाही. यासाठी आपल्याला प्रति व्यक्ती केवळ ३०० रुपये तिकीट काढावे लागते.

गोवा

गोव्याला अनेक पर्यटक आवर्जून भेट देतात गोव्याच्या अंजुना बीचवर तुम्ही बंजी जंपिंगचा आनंद घेऊ शकता. येथे तुम्ही ५०० रुपयात २५ मीटरवरून जंप करण्याचा अनुभव घेऊ शकता.

लोणावळा

मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या लोणावळ्याला तुम्ही १५०० ते २००० रुपयांत बंजी जंपिंगचा आनंद घेऊ शकता.

बेंगळुरू

बेंगळुरूमध्ये ओझोन अ‍ॅडव्हेंचर हे बंजी जंपिंगसाठी प्रचलित ठिकाण आहे. हे ठिकाण बेंगळुरुच्या सेंट मार्क मार्गावर असून येथील तिकीट जवळपास ५०० रुपये आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here