Dry Fruits : सुका मेवा खाण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहिती आहेत का ?

Dry Fruits : तुम्ही भिजवलेला सुका मेवा खात असाल, तर हे शरीरासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. ड्रायफ्रूट भिजवल्यामुळे त्यातील फायटिक ऍसिडचे प्रमाण कमी होते. त्यामुळे हे सहज पचण्यास मदत होते.

281
Dry Fruits : सुका मेवा खाण्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहिती आहेत का ?
Dry Fruits : सुका मेवा खाण्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहिती आहेत का ?

बदाम (Almonds), अक्रोड (Walnuts), अंजीर (fig), मनुका (raisin) यांसारखा सुकामेवा खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होतेच. तुम्ही भिजवलेला सुका मेवा खात असाल, तर हे शरीरासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. ड्रायफ्रूट भिजवल्यामुळे त्यातील फायटिक ऍसिडचे प्रमाण कमी होते. त्यामुळे हे सहज पचण्यास मदत होते. यासोबतच ते भिजत ठेवल्याने त्यांच्यामध्ये असलेले हानीकारक प्रिझर्वेटिव्हसुद्धा नष्ट होतात. जाणून घेऊया सुकामेवा खाण्याचे शरीराला होणारे फायदे…

(हेही वाचा – Satwiksairaj & Chirag : थायलंड ओपन स्पर्धेत भारतीय दुहेरी जोडीसमोर आव्हान फॉर्मचं)

१. आपण बदाम,आक्रोड ,अंजीर आणि मनुका यांसारखी सुकी फळे भिजवून खाऊ शकतो. दुसरीकडे काजू , पिस्ता आणि खजूर यांसारखी सुकी फळे भिजवून खाऊ नयेत.ड्रायफ्रूट्सना भिजवून ठेवल्याने ते अंकुरित होतात. त्यामुळे त्यांची न्यूट्रीशनल वैल्यू वाढते. हे तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतात.

२. ड्रायफ्रुट्स भिजवून खाल्ले तर तुमची पचनक्रिया निरोगी राहते. याशिवाय ड्रायफ्रूट्स रात्रभर भिजवून सकाळी खाल्ल्याने आरोग्य सुधारते. यामुळे बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळतो.

३. ड्रायफ्रुट्सचे सेवन केल्याने तुमचा मेंदू तीक्ष्ण होण्यास मदत होते. यामध्ये आढळणारे व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स तुमच्या मेंदूला निरोगी ठेवण्यासाठी खूप फायदेशीर मानले जातात.

४. सुक्या मेव्याचे सेवन वजन कमी करण्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्याच अनसॅच्युरेटेड फॅट्स भरपूर प्रमाणात असतात. हे तुमचे वजन कमी करण्यास मदत करतात.

५. सुकामेवा खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. दररोज सकाळी एक मूठभर सुकामेवा खाल्ल्याने अनेक रोग आपल्यापासून दूर राहण्यास मदत होते. काजू, बदाम, अक्रोड, पिस्ता, अंजीर यांचा बऱ्याच खाद्यपदार्थांमध्ये देखील वापर केला जातो.

६. सुकामेवा थायरॉईड, हृदयाचे आरोग्य आणि मेंदूच्या आरोग्यासह कर्करोगासारख्या रोगांशी लढण्यास मदत करते. यामुळे महागाची औषधे खाण्यापेक्षा कधीही सुकामेवा आहारात समाविष्ट करणे फायदेशीर.

७. अनेक अभ्यासातून असे दिसून आले आहे की, कर्करोग टाळण्यासाठी आपण नेहमी आपल्या आहारामध्ये सुक्यामेव्याचा समावेश करावा. तसेच आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी देखील सुकामेवा फायदेशीर आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.