Top Engineering Colleges In Mumbai : मुंबईतील ‘या’ टॉप इंजिनिअरिंग कॉलेजेसबद्दल जाणून घ्या

573
Top Engineering Colleges In Mumbai : मुंबईतील 'या' टॉप इंजिनिअरिंग कॉलेजेसबद्दल जाणून घ्या

अभियांत्रिकी महाविद्यालये ही अभियांत्रिकी (Engineering) क्षेत्रातील शिक्षण आणि प्रशिक्षण देणाऱ्या संस्था असतात. ही महाविद्यालये विविध अभियांत्रिकी शाखांमध्ये पदवीपूर्व आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रदान करतात. बी.ई, बी.टेक, सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक, कंप्युटर, एरोस्पेस इंजिनियरिंग असे वैशिष्ट्यपूर्ण अभ्यासक्रम देखील असतात. (Top Engineering Colleges In Mumbai)

चला तर आपण मुंबईतील सर्वोत्तम इंजिनियरिंग कॉलेजबद्दल जाणून घेऊ :

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी), बॉम्बे :

आयआयटी बॉम्बे सातत्याने भारतातील सर्वोच्च अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये स्थान मिळवते. हे अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानातील पदवीपूर्व आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रदान करणारे महाविद्यालय आहे. विशेष म्हणजे इथून उत्तीर्ण होणे, हेच मुळाच खूप प्रतिष्ठेचे असते. (Top Engineering Colleges In Mumbai)

इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (आयसीटी) :

आयसीटी मुंबई ही संस्था रासायनिक अभियांत्रिकी अभ्यासक्रमांसाठी प्रसिद्ध आहे. या संस्थेकडे संशोधनात्मक दृष्टी आहे आणि आपल्या पदवीधर विद्यार्थ्यांसाठी उत्कृष्ट प्लेसमेंट ऑफर प्रदान करते. (Top Engineering Colleges In Mumbai)

रिझवी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग (आरसीओई) :

आरसीओई, मुंबई ही शैक्षणिक संस्था दर्जेदार शिक्षण प्रदान करते आणि तेही कमी शुल्कात. ही संस्था अभियांत्रिकीमध्ये पदवीपूर्व शिक्षण देते. (Top Engineering Colleges In Mumbai)

झेवियर इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग (एक्सआयई) :

झेवियर इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग, ही संस्था मुंबई विद्यापीठाशी संलग्न आहे आणि विविध विषयांमध्ये अभियांत्रिकी अभ्यासक्रम प्रदान करते. मुंबईतील प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थांमध्ये या कॉलेजचे नाव आघाडीवर आहे. इथले लेक्चरर्स देखील उच्च शिक्षित आणि प्रॅक्टिकल ज्ञान देणारे आहेत. (Top Engineering Colleges In Mumbai)

वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट (व्हीजेटीआय) :

व्हीजेटीआय हे अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानाच्या दर्जेदार शिक्षणासाठी ओळखले जाणारे महत्वाचे महाविद्यालय आहे. विशेष म्हणजे या महाविद्यालयाला सरकारी अनुदान प्राप्त असल्यामुळे कमी शुल्कात उत्तम शिक्षण इथे प्रदान केले जाते. यामध्ये विविध पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. (Top Engineering Colleges In Mumbai)

के.जे. सोमय्या कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग (केजेएससीई) :

के.जे. सोमय्या कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग हे महाविद्यालय मुंबई विद्यापीठाशी संलग्न आहे आणि इथे विविध अभियांत्रिकी अभ्यासक्रम उपलब्ध केले जातात. या महाविद्यालयाचे वैशिष्ट्य म्हणजे प्लेसमेंटमध्ये त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड अतिशय चांगला आहे. (Top Engineering Colleges In Mumbai)

(हेही वाचा – Sanjay Raut: आघाडीमध्ये पुन्हा बिघाडी! “भान ठेवून बोलावं…”, ठाकरे संजय राऊतांवर संतापले)

ठाकूर कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी (टीसीईटी) :

ठाकूर कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी हे एक खाजगी आणि भव्य अभियांत्रिकी महाविद्यालय आहे. या कॉलेजचे वैशिष्ट्य असे की इथे संशोधन आणि नवकल्पना यावर भर दिला जातो. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल ज्ञान प्राप्त होते. इथे अभियांत्रिकीमध्ये पदवीपूर्व आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रदान केला जातो. (Top Engineering Colleges In Mumbai)

सरदार पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एसपीआयटी) :

एसपीआयटी हे मुंबईतील आणखी एक सुस्थापित अभियांत्रिकी महाविद्यालय आहे. इथला कॅम्पस आणि शैक्षणिक प्रणाली उल्लेखनीय आहे. आपल्या विद्यार्थ्यांना एक जबाबदार इंजिनियर म्हणून घडवण्यासाठी शक्यतो सर्व प्रयत्न इथे केले जातात. हे महाविद्यालय विविध विषयांमध्ये पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम देते. (Top Engineering Colleges In Mumbai)

मुकेश पटेल स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट अँड इंजिनिअरिंग (एमपीएसटीएमई) :

एमपीएसटीएमई ही संस्था एनएमआयएमएस विद्यापीठाशी संलग्न आहे आणि व्यवस्थापन अभ्यासक्रमासोबत अभियांत्रिकी अभ्यासक्रम देखील प्रदान केला जातो. यांची प्लेसमेंट सुविधा उत्तम आहे आणि इंडस्ट्रीमधील कनेक्शन उल्लेखनीय आहे. (Top Engineering Colleges In Mumbai)

द्वारकादास जे. संघवी अभियांत्रिकी महाविद्यालय (डीजेएससीई) :

डीजेएससीई हे आपल्या उत्तम दर्जाच्या शैक्षणिक अभ्यासक्रमांसाठी प्रसिद्ध आहे. तसेच इथे विद्यार्थांना व्यावहारिक ज्ञान दिले जाते. इथे अभियांत्रिकीतील पदवीपूर्व आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रदान केले जातात. (Top Engineering Colleges In Mumbai)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.