top hotel management colleges in india : हे आहेत भारतातील टॉप 5 हॉटेल मॅनेजमेंट कॉलेज

119
hotel management salary : भारतात हॉटेल मॅनेजमेंट करणार्‍यांना किती मिळतो पगार?

हल्ली देशभरात पर्यटन विकास झपाट्याने होत आहे. जगभरातले लोक आपला देश सोडून इतर देशांना कामानिमित्त, शिक्षणानिमित्त आणि पर्यटनांनिमित्त भेट देत असतात. बाहेरून आलेल्या लोकांची सुव्यवस्था करण्यासाठी देशांमध्ये अनेक हॉटेल्स बांधलेले आहेत. या हॉटेल्समध्ये पर्यटकांची खाण्याची आणि राहण्याची उत्तम व्यवस्था करण्यात येते. एखादं हॉटेल राहण्यासाठी चांगलं आहे किंवा तिथलं अन्न चविष्ट आहे तर त्याचं संपूर्ण श्रेय त्या हॉटेलमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आणि तिथल्या प्रमुख आचाऱ्याचं असतं. हे आचारी आणि कर्मचारी शास्त्रोक्त पद्धतीने हॉस्पिटॅलिटीचं शिक्षण घेऊन त्या नोकरीत रुजू झालेले असतात. (top hotel management colleges in india)

हॉटेल मॅनेजमेंट हे वेगळं शिक्षणक्षेत्र आहे. या क्षेत्रामध्ये नोकरी आणि व्यवसायाच्या कितीतरी संधी विद्यार्थ्यांना मिळत आहेत. जगभरातला पर्यटन विकास वाढल्यामुळे मोठ्या हॉटेल्समध्ये काम करणं किंवा स्वतःचा फूड बिझनेस सुरू करणं यांपैकी कोणतीही गोष्ट हॉटेल मॅनेजमेंटचे विद्यार्थी करू शकतात आणि आपलं करिअर घडवू शकतात. आज आम्ही तुम्हाला भारतातल्या काही बेस्ट अशा हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट्सची माहिती थोडक्यात सांगणार आहोत. या इन्स्टिट्युट्समध्ये शिक्षण घेतल्यानंतर तुम्ही आपलं करिअर घडवून आपल्या आयुष्याला वेगळी कलाटणी देऊ शकता. तसंच हॉटेल मॅनेजमेंटच्या क्षेत्रात उत्कृष्ट करिअर घडवू शकता. चला तर मग पाहुयात.. (top hotel management colleges in india)

(हेही वाचा – Bangladesh Protests : बांगलादेशातील हिंदू आणि इतर अल्पसंख्यांकांच्या सुरक्षेची खात्री झाली पाहिजे; विहिंपची मागणी)

१. इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, केटरिंग अँड न्यूट्रिशियन, पूसा, दिल्ली

गेल्या काही वर्षांपासून भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने या इन्स्टिट्यूटला भारतातल्या पहिल्या क्रमांकाची एक हॉटेल व्यवस्थापन संस्था म्हणून स्थान दिलं आहे. IHM मुंबई आणि IHM पुसा यांच्यामध्ये सुरुवातीपासूनच प्रथम क्रमांकासाठी खडतर स्पर्धा सुरू आहे. दोन्हीही भारतातल्या हॉटेल मॅनेजमेंटच्या सर्वोत्तम संस्था आहेत. या इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही B.Sc (H.H.A.), Diploma, IGNOU, M.Sc HA हे कोर्सेस करू शकता.

२. इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, केटरिंग अँड न्यूट्रिशियन, मुंबई

या इन्स्टिट्यूटची स्थापना १९५४ साली अखिल भारतीय महिला केंद्रीय अन्न परिषदेने केली. IHM मुंबई ही IGNOU आणि NCHMCT द्वारे मान्यताप्राप्त आहे. IHM मुंबई येथे प्रदान केलेल्या अंडर ग्रॅज्युएट कोर्समध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी अखिल भारतीय JEE च्या परीक्षेत उत्तीर्ण होणं आवश्यक आहे. IHM मुंबई यूजी, डिप्लोमा आणि सर्टिफिकेट कोर्स यांसारखे अनेक कोर्सेस प्रदान करते. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी IHM मुंबई पात्रता निकष तपासणं गरजेचं आहे. कारण नंतर कोणतीही तफावत आढळल्यास ऍडमिशन रद्द केलं जाऊ शकतं.

३. बनारसीदास चांदीवाला इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी, नवी दिल्ली

या कॉलेजमध्ये तुम्ही B.H.M.C.T. आणि हॉटेल मॅनेजमेंट अँड टुरिझम हे कोर्स करू शकता. हे कॉलेज नवी दिल्ली इथल्या बेस्ट हॉटेल मॅनेजमेंट कॉलेजेसपैकी एक आहे. इथून शिकून गेलेले विद्यार्थी या क्षेत्रात करिअर करणाऱ्या इतर नव्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्त्रोत ठरले आहेत.

(हेही वाचा – Finance Ministry : फक्त अर्थ मंत्रालयात 11 लाख पदे रिक्त)

४. इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी, सिल्वासा

इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पॉलिटेक्निक कॅम्पस, एसआरव्ही नंबर १३७/पी, मधुबन डॅम रोड, यू.टी. दादरा आणि नगर हवेली, कराड, सिल्वासा-३९६२३०, यू.टी. दादरा आणि नगर हवेली, उत्तर प्रदेश, भारत या पत्त्यावर हे हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट आठ एकर जमिनीच्या भागावर वसलेलं आहे. हे कॉलेज २०१० साली सुरू करण्यात आलं होतं. या कॉलेजमध्ये ५ फॅकल्टी मेंबर्स आहेत आणि इथली विद्यार्थिसंख्या १८७ इतकी आहे. इथे ऍडमिशन घेण्यापूर्वी NCHM JEE या परीक्षेत उत्तीर्ण व्हावं लागतं. (top hotel management colleges in india)

५. HIM, चंदिगढ

१९९० साली हे कॉलेज चंदिगढ येथे उभारण्यात आलं होतं. या कॉलेजचे २५ फॅकल्टी मेंबर्स आहेत. या कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना डिप्लोमा, B.Sc, हॉस्पिटॅलिटी अँड टुरिझम यांसारखे कोर्स करता येतात.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.