पावसाळ्यात अनेक लोक बाहेर फिरायला जातात. सध्या शहरापासून दूर निसर्गरम्य ठिकाणी पावसाचा आणि दाट धुक्याचा अनुभव घेण्यास पर्यटकांची गर्दी होत आहे. या वर्षा पर्यटनासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) निवासस्थानांना पर्यटकांची पसंती मिळत आहे. एमटीडीसीची पर्यटक निवासे निसर्गरम्य समुद्रकिनारे, ऐतिहासिक ठिकाणी, हिरव्यागार डोंगर रांगा, थंड हवेच्या ठिकाणी आणि जागतिक वारसा स्थळांच्या जवळ आहेत.
( हेही वाचा : IND vs WI : भारत – वेस्ट इंडिज मालिकांचे संपूर्ण वेळापत्रक वाचा एका क्लिकवर! )
एमटीडीकडून देण्यात येणाऱ्या सोयी सवलती आणि परिसरातील आल्हाददायक वातावरण यामुळे येथील निवासस्थानांवर पर्यटक गर्दी करत आहे.
MTDC ची पर्यटक निवासे
औरंगाबाद, अजंठाजवळ फर्दापूर, लोणार सरोवर, नाशिक विभागातील ग्रेप पार्क, भंडारदरा, महाबळेश्वर, लोणावळा, माळशेज घाट, माथेरान, कोकणातील तारकर्ली, कुणकेश्वर, हरिहरेश्वर, गणपतीपुळे ही MTDC निवासस्थाने पर्यटकांची मुख्य आकर्षण ठरत आहेत.
एमटीडीकडून सवलत
- ज्येष्ठ नागरिक, सरकारी कर्मचाऱ्यांना आगाऊ बुकिंगसाठी सवलत.
- आजी-माजी सैनिक, दिव्यांगांसाठी सवलत.
- ग्रुप बुकिंगसाठी सवलत.
- शालेय सहल.