यंदाच्या होळीला पर्यटनाचा रंग!

117

गेल्या दोन वर्षांनंतर यावर्षी पहिल्यांदाच निर्बंधमुक्त होळी साजरी होणार आहे. होळी सण नेमका वीकेंडला आल्याने गेले वर्षभर घराबाहेर न पडलेल्या नागरिकांनी बाहेरगावी जाण्याचे बेत आखले आहेत. यासाठी मुंबईकरांनी रिसॉर्ट आणि फार्महाऊसच्या पर्यायाची निवड केली आहे. त्यामुळे पालघर, कर्जत, विरार, वसई, विक्रमगड, ठाणे या भागातील रिसॉर्टचे संपूर्ण बुकिंग झाले आहे. तर, अनेकांनी लॉंग वीकेंड असल्यामुळे कोकणाची वाट धरली आहे.

रिसॉर्ट रंगांनी बहरणार

दोनवर्ष निर्बंध असल्यामुळे रिसॉर्ट व्यवस्थापक, हॉटेल चालक एकंदर पर्यटन क्षेत्राला मोठा फटका बसला. आता निर्बंध शिथिल झाल्याने नागरिक मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडत आहेत. शुक्रवारी धुळवड असल्याने त्याला जोडून आलेल्या वीकेंडचा लाभ घेत काही नागरिकांनी घराबाहेर होळी साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. रिसॉर्टचे ५० ते ६० टक्के बुकींग पूर्ण झाले असून, अनेक हॉटेल्समध्ये होळीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अलिकडचा तरूणवर्ग अशा होळी इव्हेंटला मोठ्या प्रमाणात उपस्थित राहतो.

( हेही वाचा : बाजारात येणारा आंबा खरचं “हापूस” आहे का? वाचा )

गेली दोन वर्षे पर्यटन नसल्यामुळे नुकसान झाले परंतु आता हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. तसेच अनावश्यक गर्दी होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ असे रिसॉर्ट चालकांनी स्पष्ट केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.