पर्यटकांना मोफत मिळणार ५ लाख विमान तिकिटे; हॉंगकॉंग फिरण्याची सुवर्णसंधी!

160

कोरोना काळात अनेक भागात पर्यटनावर निर्बंध होते, परंतु आता नियम शिथिल करण्यात आले आहेत. पर्यटनाला पुन्हा एकदा चालना देण्यासाठी हॉंगकॉंग सरकारने पर्यटकांना मोफत विमान तिकीट देण्याची घोषणा केली आहे. हॉंगकॉंग विमानतळ प्रशासनाने जगभरातील लोकांना ही तिकिटे मोफत देण्याची घोषणा केली आहे. पर्यटनाला चालना देणे हे यामागील प्रमुख उद्दिष्ट आहे.

( हेही वाचा : दिवाळीच्या नावावर ‘चलो अ‍ॅप’चे सबस्क्राईबर वाढवण्याची बेस्टची योजना; करा ९ रुपयांमध्ये ५ वेळा बस प्रवास )

हॉंगकॉंगला प्रमुख पर्यटनस्थळ म्हणून प्रस्थापित करण्याच्या प्रक्रियेला गती

या मोफत तिकिटांची किंमत जवळपास २ हजार १०० कोटी आहे. कोरोना महामारीपूर्वी दरवर्षी जवळपास ५० कोटी लोक हॉंगकॉंगला भेट देत होते परंतु गेली दोन वर्ष हॉंगकॉंगमध्ये पर्यटनासंदर्भात अनेक निर्बंध होते. हॉंगकॉंग सरकारच्या म्हणण्यानुसार, मोफत विमान तिकीट उपलब्ध करून दिल्याने हॉंगकॉंगला प्रमुख पर्यटनस्थळ म्हणून प्रस्थापित करण्याच्या प्रक्रियेला गती मिळेल. हॉंगकॉंग पुढील वर्षी ही मोफत तिकीटे वितरित करण्याची योजना आखत आहे. हॉंगकॉंग विमानतळ प्राधिकरण या प्रवाशांना तिकीट देईल. अद्याप याची टाईमलाईन जाहिर करण्यात आलेली नाही.

तसेच हॉंगकॉंगला जाणाऱ्या प्रवाशांना आता क्वारंटाईनचा नियम लागू नसेल. फक्त विमानात चढण्यापूर्वी २४ तास आधी अँटिजन टेस्ट निगेटिव्ह असल्याचा रिपोर्ट दाखवावा लागेल.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.