-
ऋजुता लुकतुके
टोयोटा कंपनीची नवीन कार टेसर अलीकडेच भारतात लाँच झाली आहे. टोयोटा कंपनीची भारतातील ही सगळ्यात किफायतशीर आणि किमतीने सगळ्यात कमी कार आहे. मारुती सुझुकीच्या फ्रॉन्क्स कारवर या गाडीचं डिझाईन बेतलेलं आहे. तर गाडीची स्पर्धा टाटा निक्सॉनशी आहे. तिची किंमत ७.७४ लाख रुपयांपासून सुरू होते. टोयोटा (Toyota Taisor) आणि सुझुकी या कंपन्या कारच्या डिझायनिंगसाठी एकत्र आल्या आहेत. त्यामुळे गाडीचं डिझाईन हे अगदी फ्रॉन्क्स सारखं आहे.
टोयोटाच्या (Toyota Taisor) या नवीन गाडीत डॅशबोर्डवर मध्यभागी असलेला टच स्क्रीन नऊ इंचांचा आहे. इन्फोटेनमेंट बरोबरच यात अँड्रॉईड ऑटो आणि ॲपल कारप्ले या यंत्रणा आहेत. त्यामुळे फोन या इन्फोटेनमेंट प्रणालीशी जोडला जाऊ शकतो. टेसरमध्ये काही फिचर्स हे एसयुव्ही गाडीच्या तोडीचे आहेत. यातील एक म्हणजे ३६० अंशातील कॅमेरे.
गाडीच्या फ्रंट साईडला असलेला कॅमेरा हा ३६० अंशात फिरू शकतो. आणि डिस्प्लेवर तो टिपलेली चित्र दाखवत राहतो. तसंच छतावर बसवलेला कॅमेरा हेड्सअप डिस्प्लेही दाखवतो.
(हेही वाचा – Realme 12x : रिअलमीचा १२,००० रुपयांच्या आतील ‘हा’ फोन वापरायला कसा आहे?)
#Toyota’s Urban Cruiser #Taisor has just been just launched in #India! Prices start at ₹7.74 lakh and go all the way up to Rs 13.04 lakh (ex-showroom). This Maruti Suzuki Fronx twin offers a fresh look and offered with either a 1.0-litre turbo-petrol or 1.2-litre petrol engine. pic.twitter.com/jgkgEXx31r
— ♔Kurt Morris (@morris_kurt) April 3, 2024
चालक आणि सहप्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने गाडीत ६ एअरबॅग देण्यात आल्या आहेत. एबीएस आणि ईबीडी यंत्रणांबरोबरच डोंगराळ किंवा घाटाचे रस्ते चढताना गाडीवर नियंत्रण ठेवणं सोपं जावं यासाठी यंत्रणा यात बसवण्यात आली आहे. टोयोटा टेसर (Toyota Taisor) गाडी ही १.० आणि १.२ अशा दोन इंजिन क्षमतांमध्ये उपलब्ध आहे. इंजिन पेट्रोल इंजिन आहे.
आणि गाडीत ५ स्पीड गिअर-बॉक्स आहे. शिवाय ही गाडी कंपनी फिट सीएनजी इंजिनातही उपलब्ध आहे. आधी म्हटल्या प्रमाणे ७.७४ लाखांपासून गाडीची किंमत सुरू होते. आणि ती १३ लाखांपर्यंत वर जाते. या गाडीची स्पर्धा टाटाच्या निक्सॉनशी आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community