traditional dress for girls : मुली कोणत्या प्रसंगी कोणते पारंपारिक कपडे घालू शकतात?

62
traditional dress for girls : मुली कोणत्या प्रसंगी कोणते पारंपारिक कपडे घालू शकतात?

भारतातल्या लोकांच्या कपड्यांमध्ये जाती, राहणीमान, हवामान तसंच प्रत्येक प्रदेशातल्या लोकांच्या सांस्कृतिक परंपरांनुसार बदल झालेले दिसून येतात. कपड्यांची उत्क्रांती पाहता कौपीना, लंगोटा, आचकन, लुंगी, साडी या साध्या कपड्यांपासून विधी आणि नृत्य करण्यासाठी पोशाखामध्ये कित्येक बदल झालेले दिसून येतात. शहरी भागांमध्ये पाश्चात्य पोशाख हा सर्व सामाजिक स्तरातले लोक एकसारखेच परिधान करतात. (traditional dress for girls)

कपड्याचे विणकाम, तंतू, रंग आणि कपड्यांच्या इतर साहित्याच्या बाबतीतही भारतामध्ये मोठया प्रमाणात विविधता असल्याचं दिसून येतं. बऱ्याचदा वेगवेगळ्या धर्मानुसार आणि विधींवर आधारित पोशाखांमध्ये रंग आणि कोडचं पालन केलं जातं. भारतात वापरल्या जाणाऱ्या पोशाखात भरतकाम, प्रिंट्स, हँडवर्क, अलंकार आणि कपडे वापरण्याच्या शैलीही वेगवेगळ्या असल्याचं आढळून येतं. भारतीय पारंपारिक पोशाख आणि पाश्चात्य शैलीचा पोशाख यांचं विस्तृत मिश्रण भारतामध्ये दिसून येतं. (traditional dress for girls)

(हेही वाचा – महिलांना नोकरी देणे बंद करा; अफगाणिस्तानात Taliban चा फतवा)

भारतात राहणाऱ्या महिलांच्या पोषाखामध्ये मोठ्या प्रमाणात बदल झालेले दिसून येतात. हे बदल स्थानिक संस्कृती, धर्म आणि हवामानाशी संबंधित आहेत. देशभरातल्या महिलांच्या पारंपारिक भारतीय पोशाखांमध्ये ब्लाउज आणि परकरसोबत परिधान केलेल्या साड्यांचा समावेश होतो. परकरला लेहेंगा, चनिया किंवा घागरा असंही म्हणतात. तो चोळी म्हणजेच ब्लाउजसोबत परिधान केला जातो. त्याला घागरा चोळी, किंवा परकर पोलका असंही म्हणतात. त्यावर एक मोठा दुपट्टा घेतला जातो. अनेक दक्षिण भारतीय पुरुष हे परंपरेनुसार लंगा वोनी वापरतात. (traditional dress for girls)

संपूर्ण भारतामध्ये विवाहित स्त्रिया साड्या नेसतात. पण राजस्थान आणि गुजरात यांसारख्या भागामध्ये सर्व वयोगटातल्या स्त्रिया चणीया चोळी परिधान करतात. भारतातल्या अनेक ग्रामीण भागांमध्ये, परंपरा, साधी राहणी आणि सुलभतेमुळे आजही पारंपारिक कपडे परिधान केले जातात. (traditional dress for girls)

(हेही वाचा – delhi mumbai expressway कधी पूर्ण होणार? काय आहे सद्य परिस्थिती?)

भारतीय स्त्रियांसाठी दागिने खूप महत्त्वाचे असतात. त्यांत मांग-टिक्का, कानातले, नाकातली रिंग, हार, बांगड्या, कंबरपट्टा किंवा कंबरसाखळी, पैंजण आणि पायाची जोडवी इत्यादी अनेक दागिन्यांचा समावेश आहे. हे सर्व पारंपारिक दागिने आहेत. विवाहित हिंदू महिलांसाठी सोळा शृंगार करणं महत्त्वाचं मानलं जातं. तसंच स्त्रिया कपाळावर कुंकू किंवा टिकली लावतात. तसंच भांगातही कुंकू किंवा सिंदूर भरतात. (traditional dress for girls)

इंडो-वेस्टर्न पोशाख हे पाश्चात्य आणि उपखंडीय फॅशनचं मिश्रण आहे. तसंच इतर पोशाखांमध्ये चुडीदार, गमछा, कुर्ती किंवा कुर्ता यांसारख्या कापड्यांचा समावेश होतो. भारतात कपड्यांची पारंपारिक शैली स्थान आणि तिथल्या वातावरणानुसार बदलते. शहरी भागात पोशाखांमध्ये जलद गतीने बदल होत असले तरी ग्रामीण भागात अजूनही त्या त्या ठिकाणच्या परंपरांनुसारच पोशाख परिधान केला जातो. (traditional dress for girls)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.