traditional dress for girls : मुलींनो, कोणते पारपांरिक कपडे कधी परिधान कराल?

94
traditional dress for girls : मुलींनो, कोणते पारपांरिक कपडे कधी परिधान कराल?

आपण पारंपरिक कपडे कधी घालावेत? असं तुम्हाला विचारलं तर तुम्ही म्हणाल त्यात काय विचारायचं… सणासुदीला पारंपरिक कपडे घालायचे असतात.. हो ना? पण हल्लीच्या धकाधकीच्या जीवनात स्पेशल वेळ काढून सणवार साजरे करणं, कपडे घालून मिरवायला सगळ्यांनाच जमतं असं नाही. पण तरीसुद्धा प्रत्येक जण आपापल्या परीने जे जे करणं महत्त्वाचं असतं ते ते करतच असतात. (traditional dress for girls)

वेगवेगळ्या सणावाराला त्या त्या योग्यतेनुसार पारंपरिक कपडे घालणे म्हणजे आपल्या संस्कृती आणि परंपरांविषयी आपलं किती प्रेम आहे, हे दाखवायचा एक मार्ग आहे असं म्हणता येईल. आपल्या भारतात वेगवेगळ्या प्रांतांमध्ये कित्येक वेगवेगळे सण साजरे केले जातात. प्रत्येक प्रांतामध्ये त्या त्या सणांना वेगवेगळ्या परंपरा असतात. त्या सर्वजण नेटाने पाळत असतात. (traditional dress for girls)

कपड्यांचं म्हणाल तर, प्रत्येक प्रांतानुसार तिथल्या लोकांचा पारंपरिक पोशाखही वेगवेगळा असतो. तसंच आपल्याकडे रंगीबेरंगी वस्तू आणि कपडे जास्त वापरले जातात. त्यामुळे सणावाराच्या दिवशी सगळं वातावरणच रंगीबेरंगी होऊन गेलेलं असतं. (traditional dress for girls)

पारंपरिक कपडे परिधान करणे म्हणजे आपले सण साजरे करताना होणारा आनंद आपली संस्कृती जपल्याचा अभिमान हे दोन्ही एकाच वेळी अनुभवता येतात. या लेखातून आम्ही तुम्हाला सणावाराला तुम्ही कोणत्या प्रकारचे पारंपरिक कपडे वापरू शकता, ते सांगणार आहोत. चला तर मग पाहुयात.. (traditional dress for girls)

आपल्या हिंदू धर्मातल्या सणांपैकी एक महत्त्वाचा सण म्हणजे दिवाळी होय. दिवाळीच्या दिवसांमध्ये तसेच इतर सणांमध्ये आपण सगळ्याच प्रकारचा आनंद लुटू शकतो. खाणं-पिणं, मौजमजा, गिफ्ट्सची देवाणघेवाण, चांगलेचुंगले कपडे घालून मिरवणे इत्यादी… तर सणांच्या दिवसांत वापरण्यात येणाऱ्या काही लोकप्रिय पोशाखांविषयी आम्ही तुम्हाला सांगणार आज आहोत. चला तर मग पाहुयात.. (traditional dress for girls)

(हेही वाचा – वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी Pooja Khedkar यांच्या आईला रायगडमधून अटक)

  • साडी

खरंतर साडी म्हणजे आयताकृती आकाराचा एक लांब कापड असतो.. साडी हा स्त्रियांचा पोशाख आहे. सर्व वयोगटातल्या स्त्रिया साई नसतात. रेशीम, सुती, शिफॉन आणि सिल्क अशा वेगवेगळ्या कापडांपासून सुंदर साड्या तयार केल्या जातात. तसंच त्यावर वेगवेगळ्या प्रकारची कलाकुसरही करण्यात येते. त्यामुळे सणासुदीला साडी अवश्य नेसा. (traditional dress for girls)

  • सलवार-कुर्ता

सलवार कुर्ता हा पोशाख दोन भागांमध्ये विभागलेला असतो. पायापासून ते कमरेपर्यंत सलवार घातली जाते. त्यावर गुडघ्याच्या खाली नक्षीकाम किंवा कलाकुसर करून सजवलं जात. तर कुर्ता हा गळ्यापासून ते गुडघ्यापर्यंत रुळणारा असतो. कुर्त्यावर जास्त नक्षीकाम आणि वेगवेगळ्या आकाराचे गळे शिवले जातात. हल्ली मार्केटमध्ये रेडिमेड सलवार-कुर्त्याची सुंदर रेंज उपलब्ध आहे. (traditional dress for girls)

  • लेहेंगा (लेंगा)

हल्ली सर्व वयोगटातल्या स्त्रिया सणावाराला किंवा खासकरून फंक्शन्स असतील तेव्हा लेहंगा परिधान करतात. लेहंगा हा कमरेपासून पायापर्यंत रुळणारा घुमावदार घेर असलेला असतो. त्यावर वेगवेगळ्या डिझाईन्सचे क्रॉप टॉप किंवा ब्लाऊज घालून नक्षीकाम केलेले ओढणी घेतली जाते. मार्केटमध्ये अगदी रु. १००० पासून रु. ५००० पर्यंत डिझायनर लेहेंग्यांची रेंज तुम्हाला पाहायला मिळेल. (traditional dress for girls)

  • कुर्ता पायजमा

कुर्ता म्हणजेच सदरा आणि पायजमा हा साधारणपणे पुरुषांचा पारंपरिक पोशाख आहे. कुर्ता आणि पायजमा हे सुती, सिल्क, नायलॉनच्या कापडांपासून तयार केलेले असतात. साध्या फंक्शन्समध्ये घालायला किंवा मोठ्या सणासुदीला, लग्नसमारंभासाठी तुम्ही तुमच्या आवडीनुसार पारंपरिक कपडे निवडू शकता. (traditional dress for girls)

हेही पहा –
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.