Truecaller शिवाय कळणार कोणती अनोळखी व्यक्ती तुम्हाला करतेय फोन!

Truecaller हे अॅप सर्वात लोकप्रिय असून प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये हे अॅप शक्यतो असतेच असते. कारण या अॅपचा वापर तुम्हाला कोणती अनोळखी व्यक्ती कॉल करत आहे हे सांगत असते. अनोळखी किंवा तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये अॅड नसलेल्या व्यक्तीची संपूर्ण कुंडलीच स्क्रीनवर दाखवते. याद्वारे एखादा स्पॅम कॉल आला तर त्याची माहिती देखील ट्रूकॉलर हे अॅप दाखवते. जर कल्पना करा की Truecaller या अॅपशिवाय आणि फ्रीमध्ये जर तुम्हाला कोण फोन करतंय हे कळू शकलं तर… कारण असे सांगितले जात आहे की, आगामी काळात असे एक फीचर आपल्या सर्वांसाठी जारी केले जाऊ शकते आणि TRAI देखील यावर नियोजन करत आहे.

(हेही वाचा – Alert! तुमच्या वाहनाचं PUC आहे का? नसेल तर…)

TRAI कडून अशा फीचरवर काम सुरू

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) एका अशा फीचरवर काम करत आहे, जे देशातील सर्व स्मार्टफोन युजर्सना स्पॅम कॉलपासून वाचण्यास मदत करणार आहे. ट्रायच्या अधिकाऱ्याच्या मते, ट्राय एक अशी प्रणाली तयार करण्याचा विचार करत आहे, ज्यामुळे सर्व्हिस प्रोव्हायडर्सना कोण कॉल करत आहे हे दर्शवू शकेल.

कॉलच्या वेळी स्क्रीनवर दिसणार नाव

ट्राय ज्या प्रणालीवर काम करण्याची योजना आखत आहे, ती स्मार्टफोन युजर्सच्या केवायसी (KYC) डिटेल्सवर आधारित असणार आहे. हे नवीन कॉलर आयडी फीचर युजर्सच्या परवानगीवर काम करणार आहे परंतु ते अनिवार्य नसणार आहे. टेलिकॉम कंपन्यांचे सदस्य त्यांना त्यांची नावे डिस्प्लेवर हवी आहेत की नाही हे निवडू शकणार आहेत. सध्या याबद्दल चर्चा सुरू आहे आणि ट्राय लवकरच यासंबंधी एक सल्लापत्र जारी करणार असल्याचे सांगितले जात आहे. नंतर त्याची फाइनप्रिन्ट देखील काढणार आहे. हे फीचर आल्यास युजर्सना Truecaller सारखे अॅप वापरण्याची आवश्यकता भासणार नाही.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here