ट्रेनच्या तिकिटासाठी आता रांगेत उभे राहण्याची गरज नाही; रेल्वेच्या या नव्या सुविधेद्वारे मिळेल झटपट तिकीट

174

देशभरात रेल्वेचे जाळे पसरले असून ही सर्वात स्वस्त प्रवासी वाहतूक सेवा आहे. देशभरात रेल्वेचे जाळे पसरले असल्याने अनेक लोक रेल्वेने प्रवास करण्यास प्राधान्य देतात. परिणामी सणासुदीच्या दिवसात किंवा लागोपाठ सुट्ट्या आल्या की रेल्वेला मोठ्या प्रमाणात गर्दी होते. यासाठी रेल्वेने विशेष सुविधा सुरू केली आहे. गर्दीमुळे लोकांची गैरसोय होऊ नये यासाठी रेल्वेने तिकीट आरक्षित ऑनलाईन अ‍ॅपची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. आता तुम्हाला तिकीट बुक करण्यासाठी रांगेत उभं रहायची गरज नाही. यासाठी ही अ‍ॅपधारक नवी तिकीट बुकिंग प्रणाली सुरू करण्यात आली आहे.

( हेही वाचा : सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड, १२ हजार ५०० रुपये अग्रीम देण्यास मान्यता)

६१ रेल्वे स्थानकांवर सुविधा उपलब्ध 

मंगळुरू जंक्शन आणि मंगळुरू सेंट्रलसह दक्षिण रेल्वेच्या पलक्कड विभागातील सर्व ६१ रेल्वे स्थानकांवर आता रेल्वे युटीआय अ‍ॅपवर क्यूआर कोड स्कॅन करून अनारक्षित तिकीट काढता येणार आहे. या अ‍ॅपमध्ये बुक तिकीट पर्यायवर क्लिक करून क्यू आर कोडद्वारे तुम्ही अनारक्षित तिकीट काढू शकता. सिझन तिकीट आणि प्लॅटफॉर्म तिकीट काढण्यासाठी सुद्धा क्यूआर कोडची सुविधा उपलब्ध आहे.

क्यूआर कोड स्कॅन करून तिकीट

रेल्वे स्थानकातील क्यूआर कोड स्कॅन करून प्रवाशांना त्यांच्या नियोजित ठिकाणांची निवड करता येईल. रेल्वे वॉलेट, यूपीआय, डेबिट, क्रेडिट कार्ड किंवा नेट बॅंकिंगद्वारे प्रवाशांना तिकीट काढता येणार आहे. यामुळे तिकीट काढण्यासाठी प्रवाशांना आता रांगेत उभे रहावे लागणार नाही.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.