नोकरी बदलताय? घरबसल्या ट्रान्सफर करा PF चे पैसे

98

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) ने गेल्या काही वर्षांत आपल्या युझर्सला ऑफर केलेल्या सर्व सेवांचे डिजिटायझेशन केले आहे. EPFO ने ऑनलाइन नामांकन भरणे, नवीन UAN क्रमांक तयार करण्यापासून ते EPFO खात्यातून पैसे काढण्यापर्यंत सर्व सेवा आता ऑनलाईन उपलब्ध आहेत. तुम्हाला घरबसल्या तुमचे PF चे पैसे Transfer करायचे असल्यास खालील प्रक्रिया जाणून घ्या…

( हेही वाचा : बेस्ट कर्मचाऱ्यांचा ऑनड्युटी अपघात झाल्यास, पुन्हा रूजू होईपर्यंत पूर्ण पगार मिळणार!)

जर तुम्ही तुमची नोकरी बदलली असेल आणि तुम्हाला तुमच्या आधीच्या कंपनीतून सध्याच्या कंपनीत तुमचा PF ट्रान्सफर करायता असेल, तर आता तुम्ही घरबसल्या काही क्षणात तुमचे पीएफ हस्तांतरित करु शकता.

काही क्षणात Transfer करा पैसे 

  • तुमचा UAN आणि पासवर्ड वापरून लॉग इन करा. https://epfindia.gov.in/site_en/index.php या लिंकवर क्लिक करून तुम्ही थेट लॉग इन पेजवर पोहोचू शकता. यानंतर Online service या पर्याय निवडा.
  • यानंतर One Member – One EPF Account हा ऑप्शन सिलेक्ट करा. तुमची संपूर्ण माहिती भरा आणि व्हेरिफाय झाल्यावर अकाऊंट माहिती पाहण्यासाठी Get Details Option सिलेक्ट करा.
  • क्लेम फॉर्म व्हेरिफाय करण्यासाठी तुमच्या मागील कंपनीला निवडा. मेंबर आयडी किंवा युएएन क्रमांक टाका. त्यानंतर ओटीपी सबमिट करा.
  • तुम्हाला आता तुमचा ट्रान्सफर रिक्वेस्ट फॉर्म सेल्फ अटेस्टेज करावा लागेल. यानंतर तुमच्या मागील कंपनीला तुमच्या पीएफ ट्रान्सफर रिक्वेस्टबाबत माहिती दिली जाईल. तुमच्या कंपनीने EPF ट्रान्सफरची विनंती मंजूर केल्यानंतर तुमचा PF निवडलेल्या खात्यात Transfer केला जाईल.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.