कोरोनामुळे गेली दोन वर्ष आंतरराष्ट्रीय प्रवासावर निर्बंध होते परंतु आता निर्बंध हटवल्यानंतर नागरिकांनी भटकंतीला सुरूवात केली आहे. अलिकडे लोकांमध्ये विदेशात फिरण्याची क्रेझ निर्माण झाली आहे. कोरोना काळात आर्थिक परिस्थितीही मंदावली आहे त्यामुळे बाहेरील देशात फिरायला जाताना तुम्हाला बजेट ट्रिप प्लॅन करणे गरजेचे आहे. यासाठी इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनने (IRCTC) भारतीय नागरिकांसाठी बजेट फ्रेंडली ऑफर डिझाईन केली आहे.
( हेही वाचा : विमानतळ प्रवाशांसाठी ‘बेस्ट’ सेवा; चलो अॅपवरून करता येईल सीट बुकिंग)
आयआरसीटीसीच्या या नव्या टूरबद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्या…
आयाआरसीटीसीने (IRCTC) थायलंडमध्ये फिरण्यासाठी फक्त ४९ हजार ०६७ रुपयांमध्ये एअर टूर पॅकेज ( IRCTC Air Tour Package ) डिझाईन केले आहे. या अंतर्गत तुम्ही थायलंडमधील सर्व ठिकाणी फिरू शकता. एका व्यक्तीसाठी या पॅकेजची किंमत ४९ हजार ०६७ रुपये आहे. या पॅकेजमध्ये विमान सुविधेसह इतरही सुविधा आहेत. या टूरचे नाव थायलंड डिलाइट्स एक्स गुवाहाटी (Thailand Delights Ex Guwahati) असे आहे.
हे IRCTC पॅकेज ६ दिवस आणि ५ रात्रींसाठी आहे. ही ट्रिप १३ ऑक्टोबरपासून सुरू होईल आणि १८ ऑक्टोबरला संपेल. याद्वारे तुम्ही बॅंकॉक आणि पटायामध्येही फिरू शकता.
दिल्या जाणाऱ्या सुविधा
- विमानाचे जाण्या-येण्याचे तिकीट
- निवास व्यवस्था
- सकाळी नाश्ता
- रात्रीचे जेवण
- दुपारच्या जेवणाची व्यवस्था तुम्हाला स्वत: करावी लागेल
- बुद्ध मंदिर, सफारी वर्ल्ड येथेही नेले जाईल.