IRCTC : जगन्नाथ यात्रेला जायचंय? भारतीय रेल्वे देतंय कमी बजेटमध्ये फिरण्याची संधी

194

यंदा 1 जुलैपासून भगवान जगन्नाथ रथयात्रा सुरू होत आहे. दरवर्षी जगन्नाथ यात्रेची भाविक आतुरतेने वाट पाहत असतात. दरवर्षी जगन्नाथपूरी येथील जगन्नाथ रथयात्रेचा नजारा पाहण्यासारखा असतो. हा नजारा तुम्हाला अनुभवायाचा असेल आणि तुम्ही जर यात्रेला जाण्याचा विचार करत असाल, पण जाऊ शकत नसाल, तर या वर्षी भारतीय रेल्वेने खास टूर पॅकेज आणले आहे. ज्यामध्ये तुम्ही अगदी कमी बजेटमध्ये येथे भेट देऊ शकता.

असे आहे पॅकेज

ओडिशा-जगन्नाथ रथयात्रा कार फेस्टिव्हल स्पेशल पॅकेज असे या विशेष पॅकेजचे नाव असून या पॅकेजचा कालावधी 2 रात्री आणि 3 दिवस असा आहे. याचे ट्रॅव्हल मोड फ्लाइट असून भुवनेश्वर, कोणार्क आणि पुरी हे डेस्टिनेशन असणार आहे.

1. मुक्कामासाठी हॉटेलची सुविधा असणार आहे. सामान्य किंवा डिलक्स दोन्ही प्रकारची हॉटेल्स आहेत जी तुमच्या सोयीनुसार तुम्ही निवडू शकता.

2. 2 ब्रेकफास्ट, 3 लंच आणि 2 डिनरची सुविधा उपलब्ध असणार

3. फिरण्यासाठी एसी बसची सुविधा उपलब्ध असणार.

4. या प्रवासात तुम्हाला ट्रॅव्हल इन्शुरन्सची सुविधा देखील देण्यात येणार आहे.

प्रवासासाठी किती लागणार खर्च

1. या ट्रिपमध्ये तुम्ही एकटे प्रवास करत असाल तर तुम्हाला 28 हजार 555 रुपये मोजावे लागतील. तर दोन लोकांना प्रति व्यक्ती 20 हजार 525 रुपये शुल्क आकारले जाईल. तीन लोकांना प्रति व्यक्ती 18 हजार 115 रुपये शुल्क भरावे लागेल आणि जर तुमच्यासोबत मुलं असतील तर मुलांसाठी तुम्हाला वेगळे शुल्क भरावे लागेल. बेडसह 15 हजार 825 आणि बेडशिवाय 13 हजार 480 रुपये द्यावे लागतील.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.