कोकणच्या निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी कोकण रेल्वेने दादर-मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेसला काही वर्षांपूर्वी पारदर्शक छताचा विस्टाडोम कोच बसविला आहे. या कोचला प्रवाशांचा मिळणारा प्रतिसाद पाहता त्यानंतर डेक्कन क्वीनला अशा प्रकारचा विस्टाडोम कोच बसविण्यात आला आहे. सध्या लगोपाठ आलेल्या सुट्ट्यांमुळे विस्टाडोम कोचला चांगला प्रतिसाद मिळत आहे. पावसात कोकणाचे सौंदर्य पाहण्यासाठी देशभरातून पर्यटक गर्दी करतात त्यामुळे येत्या पावसाळी महिन्यांच्या कालावधीत सुद्धा विस्टाडोमचे बुकिंग फुल्ल झाले आहे.
मुंबई ते गोवा मार्गावर कोकणातील निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी २०१८ मध्ये सर्वात आधी जनशताब्दी एक्स्प्रेसला विस्टाडोम कोच जोडण्यात आला. यानंतर २६ जून २०२१ पासून डेक्कन क्वीन विस्टाडोम कोच बसविण्यात आला.
दादर मडगाव जनाशताब्दी एक्स्प्रेस तिकीट दर – २ हजार २३५ रुपये ( यामध्ये कोणतीही सवलत नाही, प्रवाशांना पूर्ण भाडे आकारले जाईल)
चेन्नई, तामिळनाडू येथील इंटिग्रल कोच फॅक्टरी (ICF) मध्ये व्हिस्टाडोम कोच तयार करण्यात आले आहेत.