अमरावतीमधील चांदुर बाजारामध्ये मागील काही दिवसांपासून भर दिवसा झाडे कापून लाकूड तस्करी केली जात असल्याचे चित्र आहे. काही ठिकाणी झाडाला आग लावली जाते तर काही भागात भर दिवसाच झाडे कापली जात आहेत. असे असताना सुद्धा संबंधित विभागामार्फत कुठलीच कारवाई केली जात नसल्याने चांदुर बाजारवासी हैराण झाले आहेत.
( हेही वाचा : कोरोनाचा नवा विषाणू एक्सई मुंबईत पोहोचला )
दरवर्षी झाडे लावण्यासाठी सरकारकडून मोठ्या संख्येने निधी उपलब्ध करून दिला जातो. लाकडाची तस्करी करण्यासाठी तस्कर नेहमीच नवीन मार्ग काढत असतात. झाडाला मध्यरात्री आग लावली जाते आणि दुसऱ्या दिवशी ही झाडे तोडली जातात.
कठोर कारवाईची मागणी
कोरोना विषाणूने सर्वत्र थैमान घातले होते. तेव्हा प्राण वायूसाठी अनेक ठिकाणी भटकूनही प्राणवायूची व्यवस्था होत नव्हती व त्यामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. तेव्हा झाडांची किंमत खऱ्या अर्थाने मानवाला कळली असे असताना सुद्धा काही विकृत बुद्धीच्या लोकांकडून पैसे जास्त कमावण्यासाठी झाडाची कत्तल मोठ्या प्रमाणात होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अशा व्यक्तींचा शोध घेऊन कठोर कारवाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
Join Our WhatsApp Community