Hero MotoCorp कडून डॉ. ब्रिजमोहन लाल मुंजाल यांना मानवंदना

फक्‍त आमंत्रित व निवडलेल्‍या १०० ग्राहकांसाठी युनिट्स बारकाईने डिझाइन करण्‍यात आले आहे.

37
Hero MotoCorp कडून डॉ. ब्रिजमोहन लाल मुंजाल यांना मानवंदना

“माझे वडिल आणि हिरो मोटोकॉर्पचे संस्‍थापकीय अध्‍यक्ष डॉ. ब्रिजमोहन लाल मुंजाल यांनी जगभरातील अब्‍जो व्‍यक्‍तींना प्रेरित केले. त्‍यांच्‍या दृष्टिकोनाने भारतीय ऑटोमोटिव्‍ह उद्योग व भारतीय उद्योग क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणला, तसेच त्‍यांनी आपल्‍यामागे कल्‍पकता, नाविन्‍यता, शौर्य व सचोटीचा वारसा ठेवला. त्‍यांच्‍यासाठी नफ्यापेक्षा व्‍यवसाय, तसेच व्‍यक्‍ती व समुदाय महत्त्वाचे होते. (Hero MotoCorp)

आम्‍ही त्‍यांच्‍या १०१व्‍या जयंतीला साजरे करत असताना मला त्‍यांच्‍या वारसाच्‍या सन्‍मानार्थ डिझाइन करण्‍यात आलेली इंजीनिअरिंग आविष्‍कार ‘द सेन्‍टेनियल’ सादर करण्‍याचा आनंद होण्‍यासोबत अभिमान वाटतो. ‘द सेन्‍टेनियल’ उल्‍लेखनीय मोटरसायकल असण्‍यासोबत स्‍टील व कार्बन फायबरमध्‍ये रचण्‍यात आलेली आठवण आहे. या भव्‍य मशिनची डिझाइन, रचना व तंत्रज्ञानामधून आमच्‍या प्रेरणादायी संस्‍थापकांची अतूट छाप दिसून येते. (Hero MotoCorp)

त्‍यांच्‍या सर्वसमावेशक दृष्टिकोनाने हिरो समुदायामधील ग्राहक, कर्मचारी, डिलर्स, सहयोगी, पुरवठादार आणि इतर भागधारकांचे लक्ष वेधून घेतले. या १०० दिवसांदरम्‍यान आम्‍ही उत्तम आविष्‍काराची सुरूवात केलेल्‍या व्‍यक्‍तीला सन्‍मानित करत आहोत. मी सर्वांना डॉ. ब्रिजमोहन लाल मुंजालयांच्‍या १०१व्‍या जयंतीनिमित्त त्‍यांचा सन्‍मान करण्‍यामध्‍ये आमच्‍यासह सामील होण्‍याचे आवाहन करतो.” असे हिरो मोटोकॉर्पचे कार्यकारी अध्‍यक्ष डॉ. पवन मुंजाल म्हणाले.  (Hero MotoCorp)

हिरो मोटोकॉर्प ही जगातील सर्वात मोठी मोटरसायकल व स्‍कूटर उत्‍पादक कंपनी कलेक्‍टर्स एडिशन मोटरसायकल ‘द सेन्‍टेनियल’सह त्‍यांचे दूरदर्शी संस्‍थापकीय अध्‍यक्ष डॉ. ब्रिजमोहन लाल मुंजाल यांना मानवंदना अर्पण करत आहे. भारतातील हिरो सेंटर फॉर इनोव्हेशन अँड टेक्‍नॉलॉजी (सीआयटी) आणि जर्मनीमधील हिरो टेक सेंटर (टीसीजी) येथील जागतिक तज्ञांनी ‘द सेन्‍टेनियल’ची संकल्‍पना मांडण्‍यासह डिझाइन व विकसित केली. या मास्‍टरपीसमधून कंपनीची नाविन्‍यता व सर्वोत्तमतेप्रती कटिबद्धता दिसून येते. बारकाईने फक्‍त १०० युनिट्स डिझाइन करण्‍यात आले असल्‍यामुळे त्‍यामधून प्रीमियम कार्यक्षमता व कारागिरी दिसून येते. (Hero MotoCorp)

डॉ. ब्रिजमोहन लाल मुंजाल यांच्‍या १०१व्‍या जयंतीच्‍या सन्‍मानार्थ कंपनी त्‍यांचे कर्मचारी, सहयोगी, व्‍यवसाय भागीदार व भागधारकांसाठी या बाइक्‍सचा लिलाव करणार आहे. या योगदानामधील उत्‍पन्‍न समाजाच्‍या भरीव कल्‍याणासाठी वापरण्‍यात येईल, ज्‍यामधून संस्‍थापकांचे समाजाचे ऋण फेडण्‍याचे अविरत मूल्‍य दिसून येते. ‘द सेन्‍टेनियल’साठी डिलिव्‍हरींना सप्‍टेंबर २०२४ मध्‍ये सुरूवात होईल. (Hero MotoCorp)

तसेच, सर्वसमावेशकता व शाश्‍वतेप्रती कटिबद्धतेमधून प्रेरित कंपनी जागतिक बाजारपेठांसह आपल्‍या सुविधा व डिलर नेटवर्कमध्‍ये ग्राहक व कर्मचारी सहभागांच्‍या १०० दिवसांना साजरे करत आहे. या कालावधीदरम्‍यान कोणतीही हिरो मोटरसायकल किंवा स्‍कूटर खरेदी करणाऱ्या ग्राहकांना त्‍यांच्‍या खरेदीवर १०० टक्‍के कॅशबॅक मिळवण्‍याची अद्वितीय संधी असेल. ही ऑफर मर्यादित १०० वेईकल्‍ससाठी उपलब्‍ध आहे. अधिक माहिती कंपनीची वेबसाइट आणि सोशल मीडिया प्‍लॅटफार्म्‍सवर उपलब्‍ध आहे. (Hero MotoCorp)

हिरो मोटोकॉर्प ग्राहकांना ‘माय हिरो, माय स्‍टोरी’ मोहिमेमध्‍ये सहभाग घेण्‍यासाठी देखील आमंत्रित करणार आहे, जेथे ते ब्रँडसोबतचे अद्वितीय नाते व प्रवास दाखवणारे किस्‍से सांगू शकतात. विविध पार्श्‍वभूमींमधील तज्ञांचे प्रख्‍यात पॅनेल सबमिशन्‍सचे काळजीपूर्वक मूल्‍यांकन करेल आणि अव्‍वल प्रवेशिकांना प्रतिष्ठित ‘द सेन्‍टेनियल’सह सन्‍मानित करण्‍यात येईल. (Hero MotoCorp)

(हेही वाचा – Rahul Gandhi संसदेत बरळले, म्हणाले, हिंदू केवळ हिंसा आणि द्वेष पसरवतात; पंतप्रधान मोदींनी दिली समज)

द सेन्‍टेनियल

‘द सेन्‍टेनियल’ अपवादात्‍मक कारागिरी, कार्बन फायबर व मिल्‍ड अॅल्‍युमिनिअमचा वापर आणि बारकाईने केलेल्‍या रचनेसह वरचढ ठरते. वेईकलच्‍या विशिष्‍ट घटकांमध्‍ये सुधारित राइडिंग अनुभवासाठी वजनाने हलके अॅल्‍युमिनिअम स्विंगआर्म आणि लक्षवेधक आकर्षकता व रचनात्‍मक प्रबळतेसाठी नवीन डिझाइन केलेल्या कार्बन फायबर बॉडी पॅनेल्‍सचा समावेश आहे. ‘द सेन्‍टेनियल’मधील वैशिष्‍ट्ये विशेषरित्‍या विकसित, डिझाइन व अॅनोडाइज्‍ड आहेत, ज्‍यामध्‍ये हँडलबार्स, हँडलबार माऊंट्स, ट्रिपल क्‍लॅम्‍प्‍स आणि रिअर-सेट फूट पेग्‍स यांचा समावेश आहे. (Hero MotoCorp)

उत्तम कार्यक्षमता व गतीशीलता देत बाइकमध्‍ये विलबर्समधील गॅस-चार्ज्‍ड, फुल अॅडजस्‍टेबल मोनो-शॉक आणि डॅम्पिंग अॅडजस्‍टमेंटसह ४३-मिमी अपसाइड-डाऊन फ्रण्‍ट सस्‍पेंशन आहे. अॅक्रापोविकमधील टॉप-ऑफ-द-लाइन कार्बन फायबर व टायटॅनियम एक्‍झॉस्‍ट सिस्‍टममधून विशिष्‍ट, सखोल एक्‍झॉस्‍टची खात्री मिळते, जे सर्वोच्‍च कार्यक्षमतेसाठी विशेषरित्‍या ट्यून केलेले आहे आणि बाइकशी सुसंगतपणे एकीकृत होते. (Hero MotoCorp)

सोलो सीटसह कार्बन फायबर सीट काऊल आणि साइड कव्‍हर्सवरील मिल्‍ड अॅल्‍युमिनिअम स्‍पेशल एडिशन नंबर्ड बॅजिंग बाइकची अद्वितीयता व विशिष्टतेमध्‍ये अधिक भर करतात. डायमंड-कट अलॉई व्‍हील्‍स आणि इंजिन व फ्रेमच्‍या पेंट स्किममधून बारीकसारीक गोष्‍टींवर बारकाईने लक्ष देण्‍यात आल्‍याचे दिसून येते, जे मोटरसायकलच्‍या व्हिज्‍युअल लुकला अधिक आकर्षक करतात. १५८ किग्रॅच्‍या कमी कर्ब वजनासह ‘द सेन्‍टेनियल’ अपवादात्‍मकरित्‍या हलकी असून उच्‍च दर्जाचा थ्रॉटल प्रतिसाद आणि सुधारित हाताळणी व ब्रेकिंग कार्यक्षमता देते. (Hero MotoCorp)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.