पावसाळ्यात आस्वाद घ्या खमंग भजीचा! देशातील प्रसिद्ध भजींचे प्रकार तुम्हाला माहिती आहेत का?

369

पावसाळा सुरू झाली की प्रत्येकालाच चमचमीत पदार्थांचा आस्वाद घेण्याची इच्छा होते. मुंबईत तर, कांदा भजी, वडापावच्या दुकांनांवर लोकांच्या रांगा लागतात. परंतु तुम्हाला माहिती आहे का? आपल्या भारतातील काही प्रमुख राज्यांमध्ये भजी/पकोड्यांचे विविध प्रकार प्रचलित आहेत. गरमा गरम भजी आणि वाफाळलेला चहा यासारखं स्वर्गसुखं देणारं दुसरं कोणतं समीकरण असूच शकत नाही. कांदा आणि बटाटा भजी व्यतिरिक्त आपण अशाच काही भज्यांच्या विविध प्रकारांची माहिती आज घेणार आहोत…

( हेही वाचा : दिल से ‘चहा’ है तुम्हे! देशभरातील या विविध चहांचा आस्वाद तुम्ही घेतलात का?)

मिरची वडा – Mirchi Vada (राजस्थान)

मिरची वडा हा प्रकार राजस्थानमध्ये लोकप्रिय आहे. राजस्थानमध्ये सकाळच्या नाश्त्याला हमखास मिरची वडे केले जातात. लांब आणि आकाराने जाड असलेल्या हिरव्या मिरच्या बेसनाच्या पिठात मिक्स करून तळून काढल्या जातात. अलिकडे मुंबईत सुद्धा हे मिरची वडे सहज मिळतात. तुम्ही या मिरची वड्यांचा आस्वाद नक्की घ्या.

New Project 4 16

नद्रू मोंजे Nadru Monje (काश्मीर)

नद्रू मोंजे पकोडे हे काश्मीरमधील लोकप्रिय स्ट्रीट फूड आहे. हे पकोडे बनवायला सुद्धा अतिशय सोपे आहेत. कमळाचे देठांना मसाला लावून त्यांना तांदळाच्या पिठात मिक्स करून त्यानंतर तळले जाते. ही रेसिपी तुम्ही घरी सुद्धा ट्राय करू शकता.

New Project 5 14

मूग डाळ वडा Moong dal Vada (गुजरात)

मूग डाळीचे वडे गुजरातमध्ये प्रसिद्ध आहेत. गुजरातमध्ये घरगुती कार्यक्रमांना हमखास डाल वडे सर्व्ह केले जातात. बारिक केलेली मूग डाळ, कांदा, ७ ते ८ मिरच्या यांचे मिश्रण करून मूग डाळ वडे बनवले जातात.

New Project 6 13

कांदा भजी Kanda Bhaji (महाराष्ट्र)

चहा + कांदा भजी = प्रेम….अशीच व्याख्या खाद्याप्रेमींच्या स्टेटसवर आपल्याला कायम पहायला मिळते. कांदा भजी संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय आहे केवळ पावसाळ्यातच नाहीतर १२ महिने या भजीचा आस्वाद घेतला जातो. लोणावळा टायगर पॉंईंटकडे पर्यटकांना आकर्षित करणारी, पुणे- कोल्हापूरची खेकडा भजी असो किंवा मुंबईत मिळणार Onion fritters असो कांदा भजीची लोकप्रियता महाराष्ट्रात दिवसेंदिवस वाढू लागली आहे.

New Project 7 12

पनीर पकोडा Paneer Pakora (दिल्ली)

“दिल्ली जाके पकोडे नही खाए तो क्या खाए” असं सर्रास म्हटलं जातं. कारण दिल्लीत गल्लोगल्ली पकोडे विक्रेत्यांची दुकानं आहेत. दिल्लीत पनीर पकोड्याला विशेष मागणी आहे. यामध्ये सुद्धा आता पनीर चीझ पकोडा, पनीर शेजवान पकोडा असे प्रकार विविध प्रकार खवय्यांना उपलब्ध आहेत.

New Project 8 9

मधुर वडा Madhur Vada (कर्नाटक)

कर्नाटकातील मंड्या जिल्ह्यातील मद्दूर शहरावरून मधुर वडा हे नाव पडले आहे. तांदळाचे पीठ, रवा, काजू/शेंगदाणे, किसलेले खोबरे, कांदा आणि मैद्याच्या पीठापासून हे मधुर वडे बनवले जातात.

New Project 11 8

पझम पोरी Pazham Pori (केरळ)

पझम पोरी हा केरळमधील पिकलेल्या केळीपासून बनवलेला लोकप्रिय नाश्ता आहे. पझम पोरी पकोडे हे नेंद्रम पझम या जातीच्या केळ्यांपासून बनवले जातात. केरळला गेल्यावर पझम पोरी ट्राय करायला विसरू नका.

New Project 9 10

( हेही वाचा : Budget Trip : पावसाळ्यात फिरण्यासाठी सुंदर आणि हटके जागा! )

गुलगुले  Gulgule ( उत्तर प्रदेश)

गुलगुले हे उत्तर प्रदेशात खूप लोकप्रिय आहेत. उत्तर प्रदेशात तीजच्या सणाला गुलगुले बनवले जातात. गव्हाचे पीठ आणि गुळापासून हा गोड पदार्थ तयार केला जातो.

New Project 10 7

उल्ली पकोडी Ulli Pakodi (आंध्र प्रदेश)

आंध्र प्रदेशमध्ये कांदा भजीलाच उल्ली पकोडी असे म्हणतात. आंध्र प्रदेशमधील हा सर्वाधिक लोकप्रिय पदार्थ आहे.

New Project 3 24

खपसे  Khapse  (पूर्व भारत)

खपसे हा तिबेटीयन पदार्थ पूर्व भारतात लोकप्रिय आहे. खपसे हे पीठ, अंडी, लोणी, साखर घालून बनवले जातात. हे वेगवेगळ्या आकारात तयार केले जातात.

New Project 2 23

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.