TVS RTX 300 : टीव्हीएसच्या अपाचे आरटीएक्स ३०० च्या डिझाईनचं पेटंट

TVS RTX 300 : ही बाईक येत्या काही महिन्यात भारतात लाँच होऊ शकते.

45
TVS RTX 300 : टीव्हीएसच्या अपाचे आरटीएक्स ३०० च्या डिझाईनचं पेटंट
  • ऋजुता लुकतुके

जानेवारीत नवी दिल्लीत झालेल्या भारत मॉबिलिटी एक्स्पोमध्ये टीव्हीएस कंपनीने आपल्या तीन बाईक लाँच केल्या होत्या. यातीलच एक होती अपाचे मालिकेतील आरटीएक्स ३०० ही बाईक. आता या बाईकच्या डिझाईनचं पेटंट कंपनीने मिळवलं आहे. याचाच अर्थ ते नवीन आणि अभिनव असंच आहे हे नक्की. जानेवारीत पहिल्यांदा ही बाईक लोकांसमोर आली तेव्हाच तिने लक्ष वेधून घेतलं होतं. आरटी – एक्सडी४ इंजिन असलेली ही कंपनीची पहिली बाईक आहे आणि इंजिन क्षमता तब्बल २९९ सीसी इतकी आहे. (TVS RTX 300)

ही एक एडीव्ही बाईक आहे. त्यामुळे बाईकच्या पुढे विंडशिल्ड आहे. गाडीचे पुढील हेडलाईट हे आकाराने मोठे आणि त्याच्या प्रखरतेमुळे लक्ष वेधून घेणारे आहेत. त्यातून बाईकचा मर्दानी लुक समोर येतो. एक सिलिंडर असलेलं बाईकचं इंजिन ९००० आरएमपीच्या दराने ३५ पीएसचं आऊटपुट देऊ शकतो. (TVS RTX 300)

(हेही वाचा – Israel च्या हवाई हल्ल्यात पत्नीसह हमासचा सर्वोच्च नेता बर्दावील ठार)

या बाईकचा फोर्क आत वळलेला आहे आणि गाडीचं पुढील चाक हे १९ इंचांचं तर मागचं चार १७ इंचांचं आहे. दोन्ही बाजूंनी डिस्क ब्रेक लागतील. हेच या इंजिनाचं वैशिष्ट्य आहे आणि त्यासाठी कंपनीने पेटंट मिळवलं आहे. या बाईकमध्ये ट्रॅक्शन, क्रूझ कंट्रोल असेल. (TVS RTX 300)

२०२५ च्या मध्यावर ही बाईक भारतात लाँच होऊ शकते आणि या बाईकची किंमत अंदाजे २.५ लाख रुपये इतकी असेल. अपाचे आरआर ३१० आणि अपाचे आरटीआर ३१० असा दोन बाईक कंपनीने यापूर्वीच बाजारात आणल्या आहेत. या बाईकमध्येही साधारण तेच फिचर असतील. पण, या श्रेणीतही बाजारात भरपूर स्पर्धा आहे. सुझुकी व्ही स्टॉर्म एसएक्स, केटीएम २५० ॲडव्हेंचर आणि येझदी ॲडव्हेंचर या बाईक आधीच बाजारात उपलब्ध आहेत. पण. ॲडव्हेंचर बाईकच्या चाहत्यांना या बाईकचीही तितकीच उत्सुकता आहे, हे नक्की. (TVS RTX 300)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.