जुळ्या बहिणींची ‘किमया’, नेहरू आर्ट गॅलरीत चित्रांचे प्रदर्शन!

122

बालदिनाचे औचित्य साधत मुंबईतील नेहरू आर्ट गॅलरीमध्ये १४ वर्षांखालील मुलामुलींच्या चित्रकला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. आर्ट गॅलरीचे संचालक गुप्ता यांनी ९ नोव्हेंबरला सायंकाळी ४ वाजता या प्रदर्शनाचे उद्घाटन केले. या प्रदर्शनात मंडला कलाकुसरीचे गणपतीचे चित्र पाहून संचालक गुप्ता प्रभावित झाले व हे चित्र काढलेल्या ८ वर्षीय ईशीता अभिजित नार्वेकर हिला दीपप्रज्वलन करण्याचा बहुमान दिला. या प्रदर्शनात दोन परदेशी मुलीही सहभागी झाल्या होत्या.

गणपतीचे चित्र कौतुकास पात्र

Paint 2

या प्रदर्शनात ईशीता व अनया नार्वेकर यांची प्रत्येकी ५ चित्रे या प्रदर्शनात ठेवली आहेत. ९ ते १५ नोव्हेंबर दरम्यान हे प्रदर्शन नेहरू आर्ट गॅलरीमध्ये सुरू असेल. गेली दोन वर्षांपासून ईशीता व अनया चित्रकलेची आवड जोपासत आहेत. मंडला कलाकुसर या चित्र प्रकारात दोघींचाही विशेष हातखंड आहे. या दोघींनी मंडला कलाकुसर अंतर्गत काढलेले गणपतीचे चित्र कौतुकास पात्र ठरत आहे.

आनंद महत्वाचा

‘कोणतीही गोष्ट करताना निकालाची अपेक्षा न करता त्यांची आवड हेच आमचे समाधान!’, असे मत ईशीता व अनया नार्वेकर यांचे आजोबा सुहास नार्वेकर यांनी व्यक्त केले आहे. लॉकडाऊनच्या काळात चित्रकलेला या दोघींनी प्राधान्य दिले. भविष्यात देखील आम्ही कुटुंबीय कायम त्यांच्या पाठीशी असू, असेही ते म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.