Twingo Tech Mahindra : ट्विंगो टेक महिंद्रा ही संकल्पना नेमकी काय आहे? महिंद्रा ऑटोमध्ये याचा काय परिणाम होणार?

Twingo Tech Mahindra : ट्विंगो टेक महिंद्रा विषयीचं कुतुहल शमवणारे ५ प्रश्न आणि त्यांची उत्तर पाहूया 

98
Twingo Tech Mahindra : ट्विंगो टेक महिंद्रा ही संकल्पना नेमकी काय आहे? महिंद्रा ऑटोमध्ये याचा काय परिणाम होणार?
Twingo Tech Mahindra : ट्विंगो टेक महिंद्रा ही संकल्पना नेमकी काय आहे? महिंद्रा ऑटोमध्ये याचा काय परिणाम होणार?
  • ऋजुता लुकतुके 

ट्विंगो टेक महिंद्रा या नावाविषयीचं कुतुहल गेल्या काही दिवसांत चांगलंच वाढलं आहे. हा नेमका काय प्रकार आहे असा प्रश्नही विचारला जात आहे. नावा प्रमाणेच ट्विंगो टेक आणि महिंद्रा या दोन कंपन्यांनी एकत्र येऊन उभा केलेला हा प्रकल्प आहे हे उघड आहे. यात वाहन उद्योगात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि एकूणच आधुनिक तंत्रज्जान वापरून काय बदल करता येतील याच्या शक्यता तपासण्यासाठी या संयुक्त उपक्रम दोन्ही कंपन्यांनी सुरू केला आहे.

(हेही वाचा- PM Internship Scheme : पंतप्रधान इंटर्नशिप योजनेत ११३ कंपन्यांकडून ९०,८०० नोकरीच्या संधी)

महिंद्रा ऑटोमोबाईल्सला येणाऱ्या दिवसांत इलेक्ट्रिक वाहनांवर लक्ष केंद्री करायचं आहे. आणि त्यात आधुनिकता कशी आणता येईल याकडे त्यांचं लक्ष आहे. त्या अनुशंगाने ही भागिदारी महत्त्वाची आहे. आणि यातून भारतीय वाहन उद्योगाचा चेहरा मोहरा येणाऱ्या दिवसांत बदलण्यासाठीच या दोन कंपन्या एकत्र आल्या आहेत. ५ प्रश्न आणि त्यांची उत्तरं यांच्या स्वरुपात ही भागिदारी समजून घेऊया,

प्रश्न १ – ट्विंगो टेक महिंद्रा उपक्रम काय आहे?

ट्विंगो टेक आणि महिंद्रा ऑटोमोबाईल्स यांच्या भागिदारीतून हा उपक्रम सुरू झाला आहे. इलेक्ट्रिक गाड्यांमध्ये आधुनिकता आणणं आणि जगभरात पथदर्शी ठरू शकेल असं तंत्रज्जान विकसित कऱणं हे कंपनीचं उद्दिष्टं आहे. इलेक्ट्रिक वाहनांमध्ये आधुनिकता आणण्याच्या दृष्टीने हा उपक्रम उभा राहिला आहे. आता उपक्रमाचं लक्ष स्वयंचलित चालकविरहित इलेक्ट्रिक वाहनं विकसित करणं, वाहनांच्या बॅटरीची गुणवत्ता आणि क्षमता वाढवणं यावर आहे. त्याचबरोबर इलेक्ट्रिक वाहन निर्मितीत पर्यावरणपूरक साधनसामुग्री कशी वापरता येईल आणि कार्बन उत्सर्जन कसं कमी होईल यावर संशोधन हे या उपक्रमाचं काम आहे.

(हेही वाचा- Baba Siddique Shot Dead: … म्हणून Zeeshan Siddiqui थोडक्यात बचावले; काय घडलं निर्मलनगरच्या ऑफिसबाहेर?)

प्रश्न २ – ट्विंगो टेक महिंद्रामध्ये कुठलं तंत्रज्जान विकसित होत आहे?

कृत्रिम बुद्धिमत्ता आणि इंटरनेट ऑन थिंग्ज (IoT तंत्रज्जान) वापरून वाहन चालवण्याचा अनुभव स्मार्ट आणि सुरक्षित करण्याचा हा प्रयत्न आहे. बॅटरीचं आयुष्मान वाढवणं आणि स्वयंचलित इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती हे पहिलं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे.

प्रश्न ३ – तंत्रज्जानातील शाश्वत मूल्य कशी जपणार?

शाश्वत तंत्रज्जानावर काम करणं हा ट्विंगोटेक महिंद्राचा एक उद्देश आहे. आणि तंत्रज्जान टिकाऊ असावं यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू आहे. कारण, त्यातूनच पर्यावरणाला मदत होणार आहे. वाहनांमधून होणारं कार्बन उत्सर्जन कमी करण्याबरोबरच वाहन निर्मितीची प्रक्रियाही पर्यावरणपूरक असावी असा कंपनीचा प्रयत्न आहे.

(हेही वाचा- माजी आमदार Baba Siddique यांची गोळ्या झाडून हत्या; तीन हल्लेखोरांना अटक)

प्रश्न ४ – ट्विंगोटेक महिंद्रासमोरची आव्हानं काय आहेत?

भविष्यातील तंत्रज्जानावर काम करत असताना इलेक्ट्रिक वाहनांवर कंपनी काम करत आहे. पण, मूळात अनेक कारणांमुळे भारतात आणि जगभरातही इलेक्ट्रिक वाहनांवर जनतेचा म्हणावा तसा विश्वास नाही. भारतात तर तो आणखी कमी आहे. चार्जिंगची सुविधा नसणं, बॅटरीचं आयुष्माम कमी असणं अशा समस्या कंपन्यांनाही भेडसावतात. अशावेळी आधुनिक तंत्रज्जानाचं महत्त्व लोकांना पटवणंही कठीण आहे.

प्रश्न ५ – ट्विंगोटेक महिंद्राचा भारताबाहेर विस्तार होईल का? 

सध्या जगभरात इलेक्ट्रिक वाहनांवर संशोधन सुरू आहे. आणि इथं आधुनिकतेची गरज सगळ्यांनाच आहे. अशावेळी या संयुक्त उपक्रमातून निघणारं फलित जगभरातील इलेक्ट्रिक वाहन निर्मितीला प्रोत्साहन देणारं ठरू शकतं. आणि त्यातून महिंद्रा कंपनीचा विस्तारही शक्य आहे.

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.